भावी अधिकाऱ्यांचा रंगणार गौरव सोहळा
By admin | Published: August 24, 2015 01:25 AM2015-08-24T01:25:40+5:302015-08-24T01:25:40+5:30
भारतीय प्रशासकीय सेवेत येण्याचे स्वप्न बाळगलेल्या आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०१४ मध्ये झालेल्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या देशभरातील
पुणे : भारतीय प्रशासकीय सेवेत येण्याचे स्वप्न बाळगलेल्या आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०१४ मध्ये झालेल्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या देशभरातील गुणवंतांचा गौरव एमआयटी सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्युट व लोकमतच्या वतीने केला जाणार आहे. हा सोहळा बुधवारी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी ९ ते १ या वेळेत रंगणार आहे. यूपीएससी परीक्षेत प्रथम आलेली ईरा सिंघल, दुसरी आलेली रेणू राज आणि तिसरी आलेली निधी गुप्ता या टॉपर्सशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी यावेळी मिळणार आहे.
एमआयटी सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्युट व लोकमततर्फे आयोजित या आगळ््यावेगळ््या सोहळ््याचे यंदाचे सातवे वर्ष आहे. राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या या एकमेव गौरव सोहळ््यासाठी माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक व भारताचे माजी निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
प्रशासन स्वच्छ, पारदर्शी व गतिमान असेल तर विकासात्मक योजना ठरावीक कार्यकाळात पूर्ण होऊन भारताचा सर्वांगीण विकास साधला जाईल. त्यासाठी तरुणांना प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीने एमआयटी सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्युट व लोकमततर्फे हे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. गौरव सोहळ््यात देशभरातील यशवंत उपस्थित राहणार असल्याने त्यांचे मार्गदर्शन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे ठरणार आहे.