स्वच्छ भारत अभियानास मदत केल्याने गौरव

By admin | Published: March 4, 2017 01:23 AM2017-03-04T01:23:43+5:302017-03-04T01:23:43+5:30

४०० शौचालये उभारण्यास मदत केल्यामुळे लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल यांच्या हस्ते येथील भूषण मुथा यांचा गौरव करण्यात आला.

Gaurav helped the Swachh Bharat Mission | स्वच्छ भारत अभियानास मदत केल्याने गौरव

स्वच्छ भारत अभियानास मदत केल्याने गौरव

Next


वडगाव मावळ : मावळ तालुक्यात सुमारे ४०० शौचालये उभारण्यास मदत केल्यामुळे लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल यांच्या हस्ते येथील भूषण मुथा यांचा गौरव करण्यात आला. प्रथम उपप्रांतपाल गिरीश मालपाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी माजी प्रांतपालांसाठी सलाम कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सर्व माजी प्रांतपालांचे कार्य व त्यांचे मनोगत या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.
या वेळी लायन्सचे सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता विभागाचे प्रांतप्रमुख भूषण मुथा यांच्या पुढाकाराने मावळ व परिसरात सुमारे ४०० वैयक्तिक स्वच्छतागृहांचे काम पूर्ण झाले असून, लवकरच पाचशेचा टप्पा पूर्ण होत आहे. त्यानिमित्त स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक व माजी आंतरराष्ट्रीय संचालक डॉ. राजू मनवानी, नरेंद्र भंडारी, प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, प्रथम उपप्रांतपाल गिरीश मालपाणी, द्वितीय उपप्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते व फत्तेचंद रांका, राज मुछाल, शरदचंद्र पाटणकर, श्रीकांत सोनी, बाळकृष्ण जोशी, डॉ. ज्योती तोष्णीवाल, राजकुमार राठोड, हसमुख मेहता, अरुण सेठ, चंद्रशेखर शेठ, जितेंद्र मेहता आदी माजी प्रांतपाल आणि पुणे, अहमदनगर, नाशिक भागातील लायन्सच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पिन देऊन बहुमान करण्यात
आला.
स्वच्छतागृह उभारण्यास सुमारे १८ हजार रुपये खर्च येतो. त्यापैकी १२ हजार रुपये शासनाचे, तीन हजार लाभार्थी व तीन हजार रुपये भूषण मुथा यांच्यामार्फत तालुक्यात देण्यात आले आहेत. लायन्स क्लब आॅफ वडगावचे अध्यक्ष आदिनाथ ढमाले, सचिव संजय भंडारी, खजिनदार झुंबरलाल कर्नावट, संतोष चेट्टी, बाळासाहेब बोरावके आदी सदस्य उपस्थित होते. लायन्स क्लब आॅफ वडगावचे याच दिवशी तिसाव्या वर्षांत पदार्पण झाले. त्यामुळे माझा सन्मान दुग्धशर्करा योग ठरला. त्यामुळे अजून सेवाकार्ये करण्याची ऊर्जा मिळाल्याचे मुथा यांनी या वेळी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Gaurav helped the Swachh Bharat Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.