गौरी गणपती विसर्जनाला वरुणराजाचीही हजेरी
By Admin | Published: September 4, 2014 11:24 PM2014-09-04T23:24:02+5:302014-09-04T23:24:02+5:30
सुमारे 37 हजार 156 गणपतींसह सुमारे 34 हजार 1क्क् गौरींचे आज ठिकठिकाणी भक्तीभावे प्रदूषण विरहित उत्साहात व वरुणराजाने अधूनमधून लावलेल्या हजेरीत विसर्जन करण्यात आले.
जिल्ह्यात सात दिवसांपासून विराजमान झालेल्या सुमारे 37 हजार 156 गणपतींसह सुमारे 34 हजार 1क्क् गौरींचे आज ठिकठिकाणी भक्तीभावे प्रदूषण विरहित उत्साहात व वरुणराजाने अधूनमधून लावलेल्या हजेरीत विसर्जन करण्यात आले. ढोलताशाच्या गजरात व गुलालाच्या उधळणीत या सात दिवसांच्या गणपतीला निरोप देण्यात आला दरम्यान सुदैवाने कोठेही अनुचित घटना घडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाणो : तीन दिवांपूर्वी माहेरी आलेल्या 34 हजार 1क्क् गौरींचे विसर्जन गुरुवारी झाले. यापैकी 32 हजार 383 ठाणो पोलीस आयुक्तालय कक्षेतील आहेत. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एक हजार 717 गौरींचे भक्तीभावे विसर्जन करण्यात आले आहेत. तर विसर्जन करण्यात आलेल्या सात दिवसांच्या 37 हजार 156 गणपतींमध्ये शहरी भागातील 35 हजार 213 गणपतींचा समावेश होता.
यात खाजगी 35 हजार 6क् गणपतीं असून सार्वजनीक 153 गणपतींचे ठाणो पोलीस आयुक्तालय क्षेत्रत विसर्जन करण्यात आले. याशिवाय पोलीस अधीक्षकांच्या ग्रामीण कार्यक्षेत्रत एक हजार 942 गणपतींचे विसर्जन झाले आहे.
कल्याणमध्ये नऊ हजार गणपती तर 28क्क् गौरींना भावपूर्ण निरोप
कल्याण डोंबिवली शहरातील सार्वजनिक मंडळांचे 57 आणि घरगुती 9 हजार 275 गणपतींचे तर 2 हजार 825 गौरींचे विसर्जन रेतीबंदर,गणोश घाट दुर्गाडी, गौरीपाडा, कचोरे, खोणी, आधारवाडी, गोविंदवाडी, जुनी डोंबिवली या ठिकाणच्या खाडी किनारी, तलाव, विहिरी, खदाण आदी ठिकाणी पार पडले.
केडीएमसी आणि विविध सामाजिक संघटनानी डोंबिवलीतील नेहरू मैदान, प्रगती महाविद्यालय, भागशाळा मैदान, पंचायत बावडी तर कल्याणमधील खडेगोळवली येथे कृत्रिम तलावांची सोय केली होती.
मात्र, नेमक्या विसर्जनवेळीच संध्याकाळी 7 वाजता वीज गेली. पुढील 5 तास वीज येणार नसल्याचे कळल्यानंतरही भाविकांच्या उत्साहावर कोणतेही विरजण पडले नाही. विसर्जनाच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने गणोशभक्तांची तारांबळ उडाली. अनेकांना रिक्षा किंवा गाडीतच आरती केली.
शहापूरमध्ये विसर्जन : उत्साहात आगमन झालेल्या सात दिवसांच्या गणरायाला गुरूवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. किन्हवली, अघई, वासिंद, कसारा, डोळखांब, नडगांव, खर्डी, भातसानगर, शेणवे भागातील मिळून घरगुती 6क्क् व विविध गणोश मंडळांच्या 2क् गणपतींना निरोप देण्यात आला. शहापूर शहरातील गणपतींचे सापगांव येथील भातसा नदीत विसर्जन झाले. प्रस्तावित गणोशघाटाचे बांधकाम यंदाही रखडल्याने विसर्जनाच्या वेळी गणोशभक्तांची गैरसोय झाली.
गौराईसोबत बाप्पाला निरोप : टिटवाळा शहरासह ग्रामीण भागात गौराईसोबत सात दिवसांच्या बाप्पांना जड अंत:करणाने भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी 137क् गणपती बाप्पा व 398 गौरींचे विसजर्न करण्यात आले. टिटवाळा येथील हनुमान मंदिर, वासुंद्री व गुरवली काळूनदी घाट, खडवली भातसा नदी घाट, पाचवा मैल उल्हास नदीघाट तसेच फळेगांव, उशिद, उतने, राया, दानबाव, म्हस्कल, घोटसई, नांदप आदी ठिकाणच्या बाप्पांना गावालगत असणा:या नाले, हौद व डोहात गौराईसोबत मोठय़ा जड अंत:करणाने साश्रू नयनांनी विसजर्न करण्यात आले.
वाडय़ात भावपूर्ण विसजर्न
वाडा : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला, या जयघोषांनी वाडय़ात बँजोची साथ, गुलालाची उधळण करीत गणपती व गौरीला निरोप देण्यात आला. विसजर्नास अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाडा-भिवंडी महामार्ग बंद ठेवण्यात आला. या मार्गाची वाहतूक अंबाडी -दाभाडी पाईपलाईन मार्गे वळविण्यात आली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मीरा-भाईंदरमध्ये श्रींचे विसर्जन
4मीरा-भाईंदरमध्ये सात दिवसांच्या सुमारे 9 हजार गणोश मूर्तीचे विसर्जन गौराईसह मोठय़ा भक्तीभावाने करण्यात आले.
4पालिकेने यंदाच्या गणोश विसर्जनासाठी चोख व्यवस्थेसह एकुण 22 ठिकाणी विसर्जनाची सोय उपलब्ध करुन दिली आहे. यंदा कृत्रिम तलावाला प्रशासनाने लाल दिवा दाखविल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी आहे.
4पालिकेसह पोलिस यंत्रणोने आपापले कर्मचारी बाप्पांच्या शिरगणतीसाठी नियुक्त केले असून दरवर्षी वाढणा:या बाप्पांच्या संख्येत यंदाही वाढ झाल्याचे सांगण्यात आले. गतवर्षीपेक्षा शहरात यंदाच्या दिड, पाच व सात दिवसांच्या विसर्जनात 4क् टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
विसजर्न मिरवणूक
खड्डय़ांतून
मुंब्रा:गणोश उत्सवा दरम्यान वेळोवेळी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंब्यातील प्रमुख रस्त्यावरील काही भागां मध्ये पडलेल्या खड्ड्याची डागडुजी करण्यात न आल्या मुळे येथील विविध भागां मधील बाप्पा तसेच बहुतांशी गौरी ना देखील खड्डय़ांमधून डुगडुगत भक्तांचा निरोप घ्यावा लागला. दरम्यान गुरूवारी येथील नारायण नगर,रेतीबंदर,पाटील वाडी येथील खाडी किनारे याच प्रमाणो मुंब्रेश्वर मंदिरा जवळील तलाव आदी ठिकाणी येथील गौरी -गणपतीना रात्री उशिरा र्पयत पुढील वषीँ लवकर याच्या गजरात भावपूर्ण निरोप देण्यात आला.