गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप
By admin | Published: September 5, 2014 01:20 AM2014-09-05T01:20:14+5:302014-09-05T01:20:14+5:30
सात दिवसांच्या गणोशमूर्तीबरोबरच गौरींचे गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा चौपाटीसह ठिकठिकाणांच्या तलावांमध्ये भर पावसात विसजर्न करण्यात आले.
Next
मुंबई : ढोल-ताशांच्या तालासह टाळ-मृदुंगाच्या नादावर आणि डीजेच्या दणदणाटी आवाजावर सात दिवसांच्या गणोशमूर्तीबरोबरच गौरींचे गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा चौपाटीसह ठिकठिकाणांच्या तलावांमध्ये भर पावसात विसजर्न करण्यात आले. पावसामुळे सायंकाळी उशिरा सुरू झालेल्या या गणोश विसजर्न मिरवणुका रात्री उशिरार्पयत धूमधडाक्यात मार्गक्रमण करत असल्याचे चित्र होते.
श्रीगणोशाचे आगमन झाल्यानंतर सात दिवस त्याची मनोभावे पूजाअर्चा करण्यात आली. त्याला त्याचे आवडते मोदक नैवेद्य म्हणून दाखविण्यात आले. मुंबापुरीतल्या रात्री भजनाच्या आवाजाने रंगून गेल्या. तर कुठे हिंदी-मराठीतल्या रिमिक्स संगीताने जोर धरला. दीड आणि पाच दिवसांच्या गणोशमूर्तीचे विसजर्न होत नाही तोवर घराघरात लाडक्या गौराईचेदेखील आगमन झाले. माहेरी आलेल्या या गौराईचे मग हट्टदेखील पुरविण्यात आले. कुठे ङिाम्मा-फुगडय़ा रंगल्या; तर कुठे गाण्याच्या भेंडय़ा. अशा सात रात्री श्रीगणोशाची आरतीच्या तालावर बेभान सेवा केल्यानंतर गुरुवारी त्याला निरोप देण्याची वेळ येऊन ठेपली.
गुरुवारी दुपारनंतर विसजर्न मिरवणुकांना प्रारंभ झाला. शिवाय पावसानेही जोर धरल्याने या मिरवणुका पावसात न्हाऊन निघाल्या. गिरगाव, दादर, जुहू आणि वर्सोवा चौपाटय़ांसह महापौर निवास येथील कृत्रिम तलाव, सायन तलाव, कुर्ला येथील शीतल तलाव, भांडुप येथील शिवाजी तलाव आणि पवई तलाव येथे सर्वत्र गणोश आणि गौरी विसजर्नासाठी गणोशभक्तांची लाट उसळली होती. पारंपरिक वाद्ये, आधुनिक संगीताच्या जोरावर मिरवणुका विसजर्नस्थळांकडे रवाना होऊ लागल्या. सायंकाळी मिरवणुकांमध्ये उत्तरोत्तर रंगत येऊ लागली; आणि दिव्यांच्या झगमगाटाने मिरवणुका उजळून निघाल्या. (प्रतिनिधी)
च्सात दिवसांच्या गणोशमूर्ती आणि गौरी विसजर्नादरम्यान विसजर्नस्थळी महापालिका प्रशासनाकडून दक्षता घेण्यात आली होती. विशेषत: गिरगाव, दादर, जुहू आणि वर्सोवा येथील चौपाटय़ांवर जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. शिवाय गणोशमूर्तीच्या विसजर्नासाठी तराफेही सज्ज ठेवण्यात आले होते आणि यातूनच गणोशमूर्तीचे विसजर्न करण्यात येत होते. महत्त्वाचे म्हणजे दरवर्षीप्रमाणो या वर्षीही गणोशभक्तांनी कृत्रिम तलावांत गणोशमूर्तीचे विसजर्न करण्यावर भर दिला होता.
गणोश विसजर्न
घरगुती - 9 हजार 812
सार्वजनिक - 121
गौरी - 1 हजार 58
कृत्रिम तलावांत
घरगुती - 945
सार्वजनिक - 4
गौरी - 97
पुढच्या वर्षी लवकर या.. गेले सहा दिवस घरी आलेल्या बाप्पांच्या सेवेत भाविक तल्लीन होऊन गेले होते. त्यानंतर गुरुवारी निरोपाचा दिवस आल्याने गणोशभक्तांचा कंठ दाटून आला. गौरी-गणपतींचे भावपूर्ण वातावरणात विसजर्न करण्यात आले. शिवाजी पार्क चौपाटीवर यासाठी मोठी गर्दी झाली होती.