गौरी - गणरायाला निरोप
By admin | Published: September 5, 2014 01:34 AM2014-09-05T01:34:57+5:302014-09-05T01:34:57+5:30
पनवेल, नवी मुंबई व उरण परिसरामध्ये आज मोठय़ा उत्साहाने व भक्तिभावाने गौरी व गणरायास निरोप देण्यात आला.
Next
नवी मुंबई : पनवेल, नवी मुंबई व उरण परिसरामध्ये आज मोठय़ा उत्साहाने व भक्तिभावाने गौरी व गणरायास निरोप देण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. विसजर्न तलावांवर भाविकांनी मोठय़ाप्रमाणात गर्दी केली होती.
गौरी व गणरायास निरोप देण्यासाठी सायंकाळपासून विसजर्न मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. नवी मुंबईतील 23 विसजर्न तलावांवर सायंकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती. वाशीमध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शिवाजी चौकात फक्त विसजर्नासाठी आलेल्या वाहनांनाच प्रवेश देण्यात आला होता. रात्री उशिरार्पयत बाप्पाला निरोप देण्यात येत होता. महापालिका व पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. खारघरमध्ये बेलपाडा, सेक्टर 15 मधील कोपरा तलाव, सेक्टर 19 मधील विसजर्न घाटावर बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
पनवेलमधील वडाळे, कोळीवाडा, खांदेश्वर तलाव, गाढी नदीमध्ये बाप्पाचे विसजर्न करण्यात आले. उरणमधील गावांमध्येही पारंपरिक पद्धतीने गौरी व गणरायास निरोप देण्यात आला. उरणमधील विमला तलाव, खिरवाडी समुद्रकिनारा,खोपटा व मोरामध्येही विसजर्नादरम्यान चोख व्यवस्था करण्यात आली होती.
उशिरार्पयत विसजर्न सुरू
4नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामध्ये रात्री 7 वाजेर्पयत 8 हजार घरगुती गणपती व 13 सार्वजनिक गणरायांस निरोप देण्यात आला. विसजर्न शांततेमध्ये सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.