Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश, अडचणींमध्ये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 11:49 AM2023-01-24T11:49:04+5:302023-01-24T11:51:18+5:30

गौतमी डान्सच्या नावाखाली अश्लील नृत्य करते असा आरोप प्रतिभा शेलार यांनी केला आहे.

gautami patil dancer in trouble as satara court orders police to file FIR against her | Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश, अडचणींमध्ये वाढ

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश, अडचणींमध्ये वाढ

googlenewsNext

Gautami Patil : महाराष्ट्रातील जनतेला जिच्या नृत्याने वेड लावले ती गौतमी पाटील अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. गावागावातील तिच्या नृत्यांच्या कार्यक्रमाला लोक तुफान गर्दी करतात. मात्र अनेकदा कार्यक्रमांमध्ये राडाही होतो आणि पोलिसांना मध्यस्थी करण्याची वेळ येते. गौतमीचा डान्स खूपच बोल्ड असल्याने काही लोक विचित्र चाळे करतात. परिस्थिती हाताबाहेर जाते. गौतमी डान्सच्या नावाखाली अश्लील नृत्य करते असा आरोप प्रतिभा शेलार (Pratibha Shelar) यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर सातारा कोर्टाने (Satara Court) गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

अश्लील हावभाव, बोल्ड नृत्य हे समाजाला दिशाभूल करणारे आहे. हा असा प्रकार लावणी नृत्यात मोडत नाही. केवळ प्रसिद्धीसाठी हे असे चाळे करतात आणि स्वत:ला लोककलावंत म्हणतात. यावर प्रतिभा शेलार यांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार सातारा पोलिस लवकरच गौतमी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे गौतमी पाटीलने सर्व आरोप फेटाळले आहेत.

गौतमीकडून स्पष्ट करण्यात आले की, 'मी पूर्वी चूक केली होती ज्याची मी जाहीररित्या माफी मागितली आहे. परत मी तसे केलेले नाही. माझे कार्यक्रम सुरळीत सुरु आहेत. आता चूक केली नसतानाही माझ्यावर खोटे आरोप हेत आहेत. कार्यक्रमांवर बंदी घातली जात आहे हा माझ्यावर अन्याय आहे. मी पण एक कलाकार आहे आणि माझी कला सादर करत आहे. कोणाला काय बोलायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. '

Web Title: gautami patil dancer in trouble as satara court orders police to file FIR against her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.