पोलीसावर हल्ला करणारे आरोपी गजाआड

By Admin | Published: October 20, 2016 10:08 PM2016-10-20T22:08:07+5:302016-10-20T22:08:07+5:30

वाहतूक पोलिसांवर हल्ला करून एकाला गंभीर दुखापत करणा-या आरोपी बापलेकाला पोलिसांनी अटक केली.गुणवंत वामनराव तुमसरे (वय ५०) आणि शूभम गुणवंत तुमसरे

GazaAad accused of attacking polis | पोलीसावर हल्ला करणारे आरोपी गजाआड

पोलीसावर हल्ला करणारे आरोपी गजाआड

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २० : वाहतूक पोलिसांवर हल्ला करून एकाला गंभीर दुखापत करणा-या आरोपी बापलेकाला पोलिसांनी अटक केली.गुणवंत वामनराव तुमसरे (वय ५०) आणि शूभम गुणवंत तुमसरे (वय २२) अशी त्यांची नावे आहेत. ते अंबानगर, मानेवाडा (बेसा रोड) येथे राहतात. त्यांचे हार्डवेअरचे दुकान आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई राहूल अरुणराव खळतकर (वय ३०, रा. अयोध्यानगर, साईमंदीराजवळ) हे बुधवारी रात्री ८.३० वाजता रामचंद्र नानाजी रोहणकर (हवलदार) यांच्या सोबत मानेवाडा चौकाजवळ कर्तव्य बजावत होते. तेथे गुणवंत तुमसरेचा संशय आल्याने खळतकर आणि रोहनकर या दोघांनी त्यांच्यावर ड्रंक न ड्राईव्हची कारवाई करण्याची प्रक्रीया सुरू केली. त्यावरून गुणवंत यांचा पोलिसांशी वाद सुरू झाला. गुणवंत यांनी फोन करून मुलगा शूभमला ही माहिती दिली. शूभम आपल्या तीन साथीदारांसह तेथे आला. तुमसरे बापलेक आणि त्यांच्या तीन साथीदारांनी पोलिस कर्मचा-यांशी वाद घातला. प्रकरण बाचाबाचीवर आले. त्यानंतर पोलिसांजवळची काठी हिसकावून गुणवंत यांनी राहूल खळतकरच्या डोक्यावर मारली. रक्तबंबाळ खळतकरसोबतच आरोपींनी रोहनकरचीही धुलाई केली. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली. जखमी पोलिसांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. माहिती कळताच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिका-यांनी धाव घेतली.

रोहनकर यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी तुमसरे बापलेक आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवुन अश्लिल शिवीगाळ करणे प्राणघातक शस्त्रानीशी हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल केला. तुमसरे बापलेकाला अटक करण्यात आली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
नागरिकांशी सौजन्याने बोला, त्यांच्याशी वाद घालू नका, अशा स्पष्ट सूचना वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडून पोलीस कर्मचा-यांना देण्यात आल्या आहेत. मात्र, त्याकडे पोलीस कर्मचारी साफ दुर्लक्ष करताना आढळतात. ठाण्यात असो की रस्त्यावर, पोलीस नागरिकांशी अत्यंत उर्मटपणे बोलतात. त्यातून वाद सुरू होतो. थोडे कमी जास्त झालले की शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली जाते. यातूनच हे वाद घडतात. गुंड प्रवृत्तीची मंडळी पोलिसांवर हल्ले करतात. महिनाभरापूर्वी कॉटन मार्केटजवळ एका दारूड्या वाहनचालकाने असाच हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले होते. तर, आता महिनाभरात ही दुसरी घटना घडडली

Web Title: GazaAad accused of attacking polis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.