ब्लू-टूथच्या साह्याने परीक्षा देणारा गजाआड

By Admin | Published: January 1, 2016 12:06 AM2016-01-01T00:06:50+5:302016-01-01T00:06:50+5:30

यवतमाळ जिल्हा तलाठी भरती परीक्षेत डमी उमेदवाराने मोबाइलच्या मदतीने औरंगाबादेतील ‘मास्टर माइंड’ला प्रश्नपत्रिका पाठविली अन् हेडफोनवरून मिळणारी उत्तरे तो उतरवत होता,

GazaAad by using BlueTooth | ब्लू-टूथच्या साह्याने परीक्षा देणारा गजाआड

ब्लू-टूथच्या साह्याने परीक्षा देणारा गजाआड

googlenewsNext

औरंगाबाद : यवतमाळ जिल्हा तलाठी भरती परीक्षेत डमी उमेदवाराने मोबाइलच्या मदतीने औरंगाबादेतील ‘मास्टर माइंड’ला प्रश्नपत्रिका पाठविली अन् हेडफोनवरून मिळणारी उत्तरे तो उतरवत होता, पण मध्येच मोबाइलचा ‘स्पीकर’ आॅन झाला आणि त्याचे बिंग फुटले.
पुसद येथील श्रीराम आसेगावकर विद्यालय या परीक्षा केंद्रावर रविवारी हा प्रकार घडला. दुसऱ्याच्या नावाने परीक्षा देणाऱ्या करणसिंग धरमसिंग जारवाल (२२) याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे. त्याच्या मोबाइलमध्ये ‘आर. आर.’ या नावाने ‘सेव्ह’ केलेल्या क्रमांकावरून औरंगाबादेतून कोण उत्तरे देत होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
राहुल गोपीचंद गुसिंगे (२२, रा. राजेवाडी, जि. जालना) या उमेदवाराच्या नावावर करणसिंग परीक्षा देत होता. औरंगाबादेतील पवनसिंग फकीरचंद बहुरे याच्यामार्फत राहुलने तलाठी परीक्षेसाठी करणसिंगला तयार केले. त्यासाठी राहुलच्या प्रवेशपत्रावर करणसिंगचे छायाचित्र लावण्यात आले. त्यानंतर पवनसिंगने परीक्षेच्या आदल्या दिवशी एका खासगी वाहनाने करणसिंगला पुसदला आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

असा झाला पर्दाफाश
केंद्राध्यक्ष व पुसदचे तालुका कृषी अधिकारी पी. एन. राठोड परीक्षा केंद्रातून फेरफटका मारत होते. करणसिंग जवळून जात असताना त्यांना मोबाइलच्या ‘की पॅड’चा आवाज आला. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले, परंतु दुसऱ्या वेळीदेखील असाच प्रकार घडल्याने राठोड यांना संशय आला. त्यांनी करणसिंगवर पाळत ठेवली.
मोबाइलच्या माध्यमातून करणसिंगने सव्वातीन वाजताच प्रश्नपत्रिका औरंगाबादेत पाठविली होती. संबंधित व्यक्तीकडून उत्तरे मिळविण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, ब्लू-टूथ सुरू करण्याचे बटन दाबण्याऐवजी त्याने ‘स्पिकर’चे बटन दाबल्याने उत्तरे सांगणाऱ्या व्यक्तीचा आवाज केंद्रात घुमला आणि हा प्रकार उघडकीस आला.

राहुल गुसिंगे बनून परीक्षेला जाण्यापूर्वी करणसिंग जारवालने एकावर एक, असे दोन बनियन घातले होते. एकावर ब्लूटूथ चिकटपट्टीने चिटकविले आणि त्याची वायर बनियनच्या शिलाईमध्ये लपविली. मोबाइल पँटच्या खिशात ठेवला, अशाप्रकारे तयारी करून तो दुपारी तीन ते साडेचार या वेळेत होणाऱ्या परीक्षेसाठी केंद्रावर गेला.

Web Title: GazaAad by using BlueTooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.