कॉल सेंटर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार गजाआड
By admin | Published: April 9, 2017 04:07 AM2017-04-09T04:07:27+5:302017-04-09T04:07:27+5:30
मीरा रोड येथील कॉल सेंटर घोेटाळ््याचा मुख्य सूत्रधार सागर उर्फ शॅगी ठक्कर (२४) याला ठाणे पोलिसांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली.
ठाणे : मीरा रोड येथील कॉल सेंटर घोेटाळ््याचा मुख्य सूत्रधार सागर उर्फ शॅगी ठक्कर (२४) याला ठाणे पोलिसांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. नव्या तंत्रज्ञाचा वापर करून त्याने अमेरिकन नागरिकांना धमकावून खंडणी उकळल्याची कबुली दिली आहे.
कॉल सेंटरप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर, सागर उर्फ शॅगी परदेशात पळून गेल्यामुळे लूकआउट नोटीस काढली होती, त्याच्या अटकेसंदर्भात सीआरपीसी कलम-७५नुसार न्यायालयातून ४ एप्रिल रोजी स्टँडिंग वॉरंट काढून इमिग्रेशन विभागाशी संपर्क साधण्यात येत होता. याचदरम्यान, ठाणे पोलिसांना मुंबई ब्युरो आॅफ इमिग्रेशनकडून सागर दुबईहून मुंबईत येत असल्याची माहिती मिळाली होती. त्याला मुंबई विमानतळावर ब्युरो आॅफ इमिग्रेशनने ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून ठाणे गुन्हे शाखेने त्याचा ताबा घेऊन त्याला शनिवारी सकाळी अटक केली. त्याला ठाणे न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. (प्रतिनिधी)