‘लष्कर’चा दहशतवादी मुंबईत गजाआड

By admin | Published: December 10, 2015 03:21 AM2015-12-10T03:21:30+5:302015-12-10T03:21:30+5:30

लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेचा सदस्य असलेल्या असाऊद्दला खान उर्फ असद खान उर्फ अबू सुफियान (वय ५७) याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) हैदराबाद येथील पथकाने बुधवारी मुंबई विमानतळावर अटक केली

Gazaad in Mumbai's terrorist attack | ‘लष्कर’चा दहशतवादी मुंबईत गजाआड

‘लष्कर’चा दहशतवादी मुंबईत गजाआड

Next

मुंबई : लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेचा सदस्य असलेल्या असाऊद्दला खान उर्फ असद खान उर्फ अबू सुफियान (वय ५७) याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) हैदराबाद येथील पथकाने बुधवारी मुंबई विमानतळावर अटक केली. बंगळुरु येथील एका खटल्यातील तो प्रमुख आरोपी असून गेल्या तीन वर्षांपासून सुरक्षा यंत्रणेला चकवा देत होता.
अबू सुफियान मुंबई विमानतळावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने परिसरात पाळत ठेवून त्याला पहाटे अटक केली. त्याला बंगळुरु येथील न्यायालयात हजर करण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. बंगळुरु व हुबळी येथील धार्मिक नेते, पोलीस अधिकारी व पत्रकारांना मारण्याच्या कटात सहभाग असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. (प्रतिनिधी)
> कोण हा अबू सुफियान?
अबू सुफियान हा मूळचा हैदराबाद येथील असून गेल्या अनेक वर्षांपासून तो ‘लष्कर’साठी देशविघातक कृत्य करीत असल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लष्कर-ए-तोयबाचा २०१२ मध्ये बंगळुरु येथे एका धार्मिक सोहळ्यात धार्मिक नेते, पोलीस आणि पत्रकारांना मारण्याचा कट एनआयएच्या हैदराबाद पथकाने उघडकीस आणला होता. त्यामध्ये अबू सुफियानची भूमिका महत्त्वाची होती. तो विविध नावे वापरित व वेषभूषा बदलून देशभरात विविध ठिकाणी वास्तव्य करत होता.

Web Title: Gazaad in Mumbai's terrorist attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.