साहित्य संमेलनात झाला गझल गायनाचा कार्यक्रम

By admin | Published: February 4, 2017 04:25 PM2017-02-04T16:25:09+5:302017-02-04T16:25:09+5:30

गझलाचा मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी जीवनाला नवा अर्थ देणाऱ्या अनेक गझला सादर करुन उपस्थितांची चांगलीच दाद मिळविली.

Gazal singing program | साहित्य संमेलनात झाला गझल गायनाचा कार्यक्रम

साहित्य संमेलनात झाला गझल गायनाचा कार्यक्रम

Next

ऑनलाइन लोकमत 

पु. भा. भावे साहित्य नगरी , डोंबिवली, दि. 4 - गीत गुंजारते गझल, जीवनाला नवा अर्थ देते गझल हा गझलाचा मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी जीवनाला नवा अर्थ देणाऱ्या अनेक गझला सादर करुन उपस्थितांची चांगलीच दाद मिळविली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रथमच गझलला स्थान मिळाल्याने महाराष्ट्रातून गझलकार आले आहेत. दोन दिवसात चालणाऱ्या या काव्ययात्रेमध्ये ११० गझलकरांनी गझल सादर केल्या.

कविवर्य सुरेश भट गझल दालनात गझलाचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी कवी अशोक नायगावकर, गझल गंधर्व सुधाकरराव कदम, ज्येष्ठ गझलकार म.भ. चव्हाण उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गझलला स्थान मिळावे ही अनेक वर्षापासूनची गझलकारांची मागणी होती. परंतु तिला वेगळे स्थान संमेलनात आजतागायत देण्यात आले नव्हते. पण ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रथमच ‘गझल’ या काव्यप्रकाराला स्थान मिळाले. त्यामुळे गझलकारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. गझलकार सुरेश भट यांनी गेल्या ५० वर्षापासून गझलचा प्रचार करायला सुरूवात केली होती. गझलची वेगळी संमेलने होत असली तरी तिचा रदीफ आणि काफिला हा वेगळा असतो. म्हणून तिला साहित्य संमेलनात वेगळे स्थान मिळावे अशी सुरेश भट यांची मागणी होती. त्यानंतरही अनेकांनी त्यासाठी प्रयत्न केले. पण त्या प्रयत्नांना यश आले नव्हते.

आजपर्यंतची साहित्य संमेलन ही केवळ ‘कविता’ या प्रकारात भोवतीच फिरत होती. ९० व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने गझलकार शर्वरी मुनीश्वर, प्रशांत वैद्य, प्रा. अरूणोदय भाटकर यांनी गझलाला संमेलनात स्थान मिळावे अशी सूचना आयोजक आगरी युथ फोरमकडे केली होती. त्यानुसार तिला संमेलनात स्थान देण्यात आले आहे. 

अनिल आठल्यकरे यांनी ‘‘अप्राप्य कोटीचे असे दुर्भाग्य आहे हे , तुझ्या नजरेत आहे पण, तुझ्या कक्षेत नाही ’’या गझल ने झाली. वर्षा बेडगीर यांनी गाठला मुक्काम पण, सोडविना पालखी ही गझल सादर केली. दुसऱ्या सत्रात प्रशांत जामदार यांच्या देइल स्वराज्य नक्की, माझीच बंडखोरी, माझ्यातला शिवाजी आगऱ्यात बसत नाही या मुशायिराने झाली. जयदीप जोशी यांनी ‘‘नवा रस्ता निवडल्यावर असे होते, प्रशंसा व्हायच्या आधी हसे होते’’ तिसऱ्या सत्रात संतोष घुले यांनी ‘‘श्रध्दा, भक्ती, प्रेम तुम्हावर, तिला पाहूनिया गझल लिहिल्या मी साऱ्या’’ आणि शब्द शब्द आठवत लिहिलं रोज तिच्यावर गझल नवी ही गझल सादर केली.

वसईवरून आलेल्या शिल्पा परूळेकर यांनी ‘आधार शोधताना आधार होत गेले, जो भेटला तसा मी आकार होत गेले’ ही गझल सादर करताच पे्रक्षकांनी वाह क्या बात है ची दाद दिली. पुण्याहून आलेल्या श्वेता द्रविड यांनी झळा सोसण्याची तुझी जात नाही. दे्रवेंद्र गाडेकर द्वेष, मत्सर, क्र ोध सारे दूर करूया आपल्या देहास पंढरपूर, गोष्ट छोटी पण तिने कादंबरी केली. आत्महत्येची लिहून ठेवली चिठ्ठी, सर्व दुखाने खुशीने सही केली हे शेर सादर केले. त्यानंतर त्यांनी पोरकी झालीस तु इतकेच आठवते, हरली नाहीस तु एवढेच आठवते ही गझल सादर करून प्रेक्षकांची टाळ््याच्या कडकडाटात दाद मिळविली. प्रशांत जामदार यांनी निवडून मला तू जिंकली पाहिजे, लोकशाही आता संपली पाहिजे हा शेर सादर केला. आनंद रघुनाथ यांनी ‘अश्या ही किर्र अंधारात सोबत सावली आहे ’ही गझल सादर करून प्रेक्षकांची वाहवाह मिळविली.

साहित्य संमेलनात काव्यवाचनाला तीन दिवसात २८ तासांचा वेळ देण्यात आला आहे. गझलकट्टयात सहभागी होणाऱ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले . प्रत्येकाला संधी मिळावी यासाठी गझलला स्वतंत्र व्यासपीठ देण्यात आल्याचे समितीचे प्रशांत वैद्य यांनी सांगितले आहे.

Web Title: Gazal singing program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.