Geeta News: पाकिस्तानातून परतलेली मुकबधिर तरुणी गीता महाराष्ट्राच्या नांदेडमधील; आईला भेटणार पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 11:19 AM2021-03-11T11:19:57+5:302021-03-11T12:00:39+5:30

Geeta returned from Pakistan in 2015: गीताला तिचे पालक मिळवून देण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागले आहेत. गेल्यासाडेचार वर्षांपासून तिच्या आई वडिलांचा शोध सुरु होता. देशभरातून ज्यांनी ज्यांनी दावे केले होते त्यांचे डीएनए जुळविले जात होते. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे. गीताच्या आईचे नाव मीना असून तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. 

Geeta's name is Radha waghmare who returned from Pakistan; met Real Mother of Maharashtra | Geeta News: पाकिस्तानातून परतलेली मुकबधिर तरुणी गीता महाराष्ट्राच्या नांदेडमधील; आईला भेटणार पण...

Geeta News: पाकिस्तानातून परतलेली मुकबधिर तरुणी गीता महाराष्ट्राच्या नांदेडमधील; आईला भेटणार पण...

googlenewsNext

लहान वयात चुकून पाकिस्तानात गेलेली आणि दिवंगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या काळात भारतात परतलेली गीता नावाच्या मूकबधिर महिलेला तिची खरी आई भेटली आहे. गीताचे खरे नाव हे राधा वाघमारे असून महाराष्ट्रातील नांदेडमधील नायगाव हे तिचे गाव असल्याचे समोर येत आहे. भारतात परतल्यानंतर जवळपास साडेचार वर्षांनी गीता तिच्या घरी जाणार आहे. (Geeta, who returned to India on October 26, 2015 after intervention by then External Affairs Minister Sushma Swaraj got his family from Maharashtra.)


गीताला तिचे पालक मिळवून देण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागले आहेत. गेल्यासाडेचार वर्षांपासून तिच्या आई वडिलांचा शोध सुरु होता. देशभरातून ज्यांनी ज्यांनी दावे केले होते त्यांचे डीएनए जुळविले जात होते. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे. गीताच्या आईचे नाव मीना असून तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. 


भारत-पाकिस्तान दरम्यान रेल्वेसेवा सुरु असताना ही राधा 11-12 वर्षांच्या वयात चुकून पाकिस्तानमध्ये गेली होती. ती कराचीमध्ये रेल्वे स्टेशनवर सामाजिक संस्था ईधी फाउंडेशनला सापडली होती. ईधीने तिला आपल्या आश्रमातच वाढविले होते. सुरुवातीला तिचे नाव फातिमा ठेवण्यात आले होते. तिला बोलता, ऐकता येत नव्हते. मात्र, नंतर तिच्या वागण्यावरून ती मुस्लिम नसल्याचे लक्षात आले, यानंतर ती हिंदू असल्याचे समजताच तिचे नाव गीता ठेवण्यात आले. सुषमा स्वराज यांनी 2015 मध्ये तिला भारतात आणले होते. 


पाकिस्तानचे इंग्रजी वृत्तपत्र द डॉनने देखील या वृत्ताची पुष्टी केली आहे. ईधी वेल्फेअर ट्रस्टचे दिवंगत अध्यक्ष अब्दुल सत्तार ईधी यांची पत्नी बिलकिस ईधी यांनी सांगितले की, गीताला तिची खरी आई भेटली आहे. याच आठवड्यात तिने आई भेटल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी संपर्क केला होता. तिची आई महाराष्ट्रातील नायगावची आहे. तिचे खरे नाव हे राधा वाघमारे आहे. तिच्या आईचा डीएनए जुुळविण्याचे काम सुुरु आहे.


गीताच्या आईने दुसरे लग्न केले...
गीताला एवढ्या वर्षांनी जरी तिची खरी आई सापडली असली तरी देखील तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. यामुळे गीता तिच्या वडिलांना भेटू शकली नाही. 


लहान असताना रेल्वेने चुकून पाकिस्तान मध्ये गेलेली गीता स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने 2015 मध्ये भारतात आली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबातील सदस्यांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी भेटी देण्यात आल्या. त्यात परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील एका कुटुंबाने गीता आपली मुलगी असलयाचा दावा केला होता. तपासात प्रथम दर्शनी त्यामध्ये बरेचसे तथ्य आढळले असून गीताचे मूळ नाव राधा वाघमारे असल्याची माहिती आहे, परंतु डी एन ए तपासणी झाल्याशिवाय तिला तिच्या कुटुंबियाच्या ताब्यात देता येत नसल्याची माहिती इंदोर येथील आनंद सर्व्हिस सोसायटीचे ज्ञानेन्द्र पुरोहित यांनी लोकमत शी बोलताना दिली. गीता सध्या या संस्थेच्या ताब्यात आहे. 

Read in English

Web Title: Geeta's name is Radha waghmare who returned from Pakistan; met Real Mother of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.