सर्वसामान्य नागरिक हाच केंद्रबिंदू : कुल
By admin | Published: June 9, 2016 01:39 AM2016-06-09T01:39:35+5:302016-06-09T01:39:35+5:30
सर्वसामान्य नागरिक हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून आजतागायत प्रामाणिकपणे कामे केली आहेत
पाटेठाण : सर्वसामान्य नागरिक हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून आजतागायत प्रामाणिकपणे कामे केली आहेत. दरम्यान, विरोधकमंडळी नुसती लगीनघाई करत बिनकामाची लुडबूड करत या परिसरात झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटने करताना दिसत असल्याचे आमदार राहुल कुल यांनी स्पष्ट केले.
पाटेठाण (ता. दौंड) येथे नवीन ग्रामसचिवालय व व्यापारी संकुल, आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडी इमारत अशा विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.
परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी भामा-आसखेड धरणग्रस्तांसाठी आरक्षित झाल्या आहेत. काही ग्रामपंचायतींनी पाणी नको म्हणून चुकीच्या पद्धतीने ठराव केले होते. पाणंद रस्त्यासंदर्भात पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून अनेक रस्ते खुले होण्यास मदत होणार असल्याचे कुल यांनी सांगितले.
या वेळी वैशाली आबणे, शिवाजी सोनवणे, बंडोपंत नवले, निवृत्ती गवारी, उषा चव्हाण, सुमंतबापू हंबीर महाराज, आशा मांढरे, शाखा अभियंता एस. आर. गांधी, विजय हंबीर, अनिल पाबळे, ग्रामसेवक संतोष सकट, संदीप हंबीर, रवींद्र वडघुले, किसन घाडगे, बापू हंबीर, अमोल हंबीर, सुरेश हंबीर, रोहिदास हंबीर, केशव हंबीर, वाल्मीक हंबीर, सत्यवान वडघुले, बाबूराव हंबीर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.