सामान्य नागरीक चार दिवसात शिकले काटकसर करायला

By admin | Published: November 13, 2016 08:09 AM2016-11-13T08:09:15+5:302016-11-13T08:11:21+5:30

आपण नेहमी पैशाची बचत कशी करावी याचा विचार करीत असतो. परंतु जास्‍त बचत काही होत नाही पण मागील चार ते पाच दिवसात सर्वच नागरींकानी काटकसर करत पैसा वापरला.

The general citizen learned four days to get thrived | सामान्य नागरीक चार दिवसात शिकले काटकसर करायला

सामान्य नागरीक चार दिवसात शिकले काटकसर करायला

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ -  दिवाळीनंतर सगळं कसं निवांत वाटत असलं तरी प्रत्येकाच्या मनात एक हिशेब चाललेला असतो. दुकानदार, व्यापारी मंडळी दिवाळीच्या हंगामात झालेल्या नफ्याच्या हिशेबात गुंतलेली असतात तर इतर जण केलेल्या खर्चाचा हिशेब मांडत राहतात. खिशाला चाट पडेल इतका खर्च केला आपण म्हणून मग कित्येकांना ओशाळायला होतं. काटकसर करायला हवी म्हणून मनाचा निश्चय होतो. आपण नेहमी पैशाची बचत कशी करावी याचा विचार करीत असतो. परंतु जास्‍त बचत काही होत नाही पण मागील चार ते पाच दिवसात सर्वच नागरींकानी काटकसर करत पैसा वापरला. मंगळऴवार ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशांविरोधातील आपली मोहीम तीव्र करत ५०० व १००० च्या नोटा व्यवहारातून बाद केल्या. सामान्य जनतेला ह्या नोटा बँकेत भरून एका मर्यादेपर्यंत नविन नोटांच्या स्वरुपात काढता येतील. या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा झाल्यावर सामान्या नागरींकांना शंभर ची नोट खर्च करायची असते पण ती मोडायला जीवावर येते आहे.

मोदींनी केलेले काळ्या पैशांच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर नागरीकांना आता असं वाटतंय शंभर रुपयातही तीन चार दिवस जगणं इतकं काही कठीण नाही, साधेपणाने जगण्याची वेगळीच नवलाई असल्याचं जाणवतं आहे. या निर्णयामुळे लोकांचा वरखर्च, टॅक्सी सगळ्यावरच आळा बसलाय. या चार दिवसात जणू बचतीची सगळीकडेच शाळा भरली आहे.

मोदींनी जसे नोटा बदलायचा निर्णय घेतला तसेचं अनपेक्षित पणे लोकांमध्ये एक वेगळे शहाणपणचं आले आहे. नोटांसोबत लोकांचे आचार विचार बदलले दिसून आले. जसं काळया पैशाचा शेवटही काळाच... आणि लाचार.

दरम्यान, पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यामुळे जनतेला त्रास होत असल्याबद्दल खेद व्यक्त करीत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जनतेला आणखी तीन आठवडे संयम राखण्याचे आवाहन केले असले तरी किमान एक महिनाभरहा गोंधळ सुरू राहणार आहे. जेटली तीन आठवड्यांची भाषा करीत असले तरी १00 रुपयांच्या पुरेशा नोटा उपलब्ध नाहीत. शिवाय ५00 आणि १000 रुपयांच्या नव्या नोटा छापून बँकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. जुन्या नोटा बदलण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना बँका दोन हजारांच्या नोटाच देत आहेत. पण सुटे ना बँकेकडे आहेत ना बाजारात.

Web Title: The general citizen learned four days to get thrived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.