जर्मन बेकरी बाँबस्फोट - हिमायत बेगची फाशी रद्द, जन्मठेपेची शिक्षा

By admin | Published: March 17, 2016 03:29 PM2016-03-17T15:29:31+5:302016-03-17T15:40:18+5:30

पुण्यातील जर्मन बेकरी बाँबस्फोटातील आरोपी हिमायत बेगची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.

German Bakery bomb blasts: Himayat Baig's death sentence, life imprisonment sentence | जर्मन बेकरी बाँबस्फोट - हिमायत बेगची फाशी रद्द, जन्मठेपेची शिक्षा

जर्मन बेकरी बाँबस्फोट - हिमायत बेगची फाशी रद्द, जन्मठेपेची शिक्षा

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - पुण्यातील जर्मन बेकरी बाँबस्फोटातील आरोपी हिमायत बेगची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. 10 पैकी 9 आरोपांमधूनही न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले आहे. एका आरोपामध्ये तो दोषी असल्यावर शिक्कामोर्तब करत मुंबई उच्च न्यायालयाने हिमायत बेगला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
 
 
पुण्यात २०१० मध्ये झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात १७ जणांचा मृत्यू, तर ५८ जण गंभीररीत्या जखमी झाले. त्यात परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. २०१३ मध्ये पुणे सत्र न्यायालयाने बेगला बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली.

Web Title: German Bakery bomb blasts: Himayat Baig's death sentence, life imprisonment sentence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.