जर्मन पर्यटकाची जीपीएस यंत्रणा खामगावात चोरी

By admin | Published: January 22, 2016 01:19 AM2016-01-22T01:19:40+5:302016-01-22T01:19:40+5:30

जर्मन पर्यटक जगभ्रमंतीसाठी मोटारबाईकने आला होता भारतात.

The German Freedom GPS system was stolen in the hinge | जर्मन पर्यटकाची जीपीएस यंत्रणा खामगावात चोरी

जर्मन पर्यटकाची जीपीएस यंत्रणा खामगावात चोरी

Next

खामगाव (बुलडाणा): जगातील धोकादायक रस्त्यांवर विक्रमी वेळेत प्रवास करून चारवेळा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणारा र्जमन पर्यटक गॅरी मार्या उर्फ गॅहात याच्या मोटारबाईकवरील जीपीएस यंत्रणा खामगाव शहरातून २0 जानेवारी रोजी चोरी झाली. त्यामुळे विक्रमी वेळेत प्रवास करून आणखी एक विक्रम नोंदविण्याच्या त्याच्या प्रयत्नांना खिळ बसली आहे.
कॅनडा, अमेरिका, तसेच दक्षीण अमेरिकेतील सर्वात घातक महामार्गावरून विक्रमी वेळेत प्रवास करणार्‍या गॅरी मार्या याने गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये चार विक्रम नोंदविले आहेत. जगभ्रमंतीसाठी निघालेला गॅरी चार चाकी मोटारबाईकने मुंबईहून कलकत्ताकडे जात असताना, राष्ट्रीय महामार्गावर खामगावनजीक त्याला मोहन तायडे नामक खामगाव येथील रहिवाशाने थांबविले. हा महामार्ग धोकादायक असून, वाहनाची वेग र्मयादा कमी ठेवण्याचा सल्ला तायडे यांनी गॅरीला दिला. या संवादातून दोघांची ओळख झाली. २0 जानेवारी रोजी गॅरी हा तायडे यांच्या संजीवनीनगरमधील निवासस्थानी मुक्कामी थांबला. त्यावेळी त्याला बघण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेत, अज्ञात व्यक्तीने मोटारबाईकवरील जीपीएस यंत्रणा चोरून नेली. रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. गॅरीने मोहन तायडेसोबत खामगाव पोलिस स्टेशनला पोहोचून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी संजीवनीनगर भागात जाऊन घटनेची माहिती घेतली. गॅरीची जीपीएस यंत्रणा कुणाला सापडली असेल तर ती परत द्यावी, असे आवाहन पोलिसांनी उद्घोषकावर केले; मात्र त्याचा उपयोग झाला नाही. या घटनेची खामगाव पोलिसांनी नोंद केली; मात्र गॅरीने तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल झाला नाही.

टेस्ट पायलट म्हणून करतो काम
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅरी र्जमनीत टेस्ट पायलट म्हणून काम करतो. त्याला पॅराग्लायडींगचा छंद आहे. हिमालयात सात हजार ७00 मीटर उंचीवर पॅराग्लायडींग करण्याचा त्याने प्रयत्न केला होता.

Web Title: The German Freedom GPS system was stolen in the hinge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.