गद्दारांचे वस्त्रहरण करा : जाधव

By admin | Published: August 18, 2015 11:02 PM2015-08-18T23:02:18+5:302015-08-18T23:02:18+5:30

राष्ट्रवादीचा चिंतन मेळावा : सुनील तटकरे म्हणाले... एलबीटी रद्द करा मात्र सामान्य माणसावर कर बसवला गेल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल.

Get dressed with traitors: Jadhav | गद्दारांचे वस्त्रहरण करा : जाधव

गद्दारांचे वस्त्रहरण करा : जाधव

Next

रत्नागिरी : चिपळूणचा राजकीय धसका घेऊन पक्ष सोडला, असे जर उदय सामंत म्हणत असतील तर त्यांची भूमिका पूर्णत: चुकीची आहे. पक्षाने ज्यांना महत्त्वाची पदे, मंत्रीपद, पालकमंत्रीपद दिले त्याने आयत्यावेळी एबी फॉर्म घेऊनही पक्ष बदलला, स्वार्थासाठी विश्वासघात केला, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावला, तर सर्व पदे भोगूनही विश्वासघात करणाऱ्या या नादान माणसाचे जाहीर सभा घेऊन राजकीय वस्त्रहरण केले पाहिजे, असा तिखट वार माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीच्या चिंतन मेळाव्यात केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या राज्यव्यापी संपर्क दौऱ्याला मंगळवारी रत्नागिरी येथून सुरूवात झाली. यानिमित्ताने साईमंगल कार्यालयात पक्षाचा जिल्हा चिंतन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री जाधव, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, राजाभाऊ लिमये, चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम, माजी मंत्री रवींद्र माने, राष्ट्रवादी प्रदेश युवकचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय कदम, बशीर मुर्तुझा, कुमार शेट्ये, संदेश कोंडविलकर, बाबाजी जाधव, अजय बिरवटकर आदी मान्यवर नेते उपस्थित होते. तटकरे यांनी या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर जळजळीत टीका केली. मोदी हे देशाच्या संसदेपेक्षा परदेशातच अधिक काळ असतात. पत्रकारांना परदेश दौऱ्यावर नेण्याचा व पारदर्शकता दाखवण्याचा पायंडा यांनी मोडला आहे. आपले भांडे फुटू नये म्हणून हे सारे घडते आहे. पेट्रोल, डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय क्रूड तेलाच्या सध्याच्या किमतीनुसार ३५ व २५ रुपये प्रतिलिटर असायला हवे होते, असे असतानाही ७० रुपयाने विकले जात आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या सेनेच्या कुवारबाव येथे काढलेल्या मोर्चात माणसेच दिसली नाहीत. येथे शिवसेनेचे वर्चस्व आहे, असे सांगणाऱ्या नेत्यांना या मोर्चात कार्यकर्ते, लोकांना का एकत्र आणता आले नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. एक काळ भाजपचे केंद्रीय नेते मुंबईत आले की मातोश्रीवर यायचेच. आज असे होत नाही. याचाच अर्थ शिवसेनेच्या हाती आता रिमोटच राहिलेला नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)


तुम्हीच याला संपवा...
भास्कर जाधवना बदला व उदय सामंतना मंत्रीपद द्या, पालकमंत्रीपद द्या, असा तगादा त्यावेळी लावणाऱ्यांनी हा विश्वासघात उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे. त्यावेळी बदलाची मागणी करणाऱ्यांना आता माझे सांगणे आहे की, त्यांनी हे पाप संपवले पाहिजे, असे भास्कर जाधव म्हणाले.
तटकरे म्हणाले...
एलबीटी रद्द करा मात्र सामान्य माणसावर कर बसवला गेल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल.
कार्यकर्त्यांनी २०१६मधील पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक तयारीला लागावे.
रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील संघटनेला बळ देण्यासाठी जाधवांनी कमान सांभाळावी.
 

Web Title: Get dressed with traitors: Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.