मराठा समाजाला आरक्षण मिळावे - महादेव जानकर

By admin | Published: September 18, 2016 04:59 PM2016-09-18T16:59:15+5:302016-09-18T16:59:15+5:30

त्या-त्या जातीच्या आरक्षणाप्रमाणेच मराठा समाजाला देखील आरक्षण मिळाले पाहिजे अशी आपली स्वत:ची भूमिका आहे

Get reservation for Maratha community - Mahadev Jankar | मराठा समाजाला आरक्षण मिळावे - महादेव जानकर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे - महादेव जानकर

Next

ऑनलाइन लोकमत

नाशिक,दि.18- त्या-त्या जातीच्या आरक्षणाप्रमाणेच मराठा समाजाला देखील आरक्षण मिळाले पाहिजे अशी आपली स्वत:ची भूमिका आहे. मराठा समाजाच्या आणि तरुणांच्या प्रगतीसाठी मराठा तरुणांनी आपण उद्योजक कसे होऊ याचा देखील विचार केला पाहिजे असे प्रतिपादन पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.   

नाशिकध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी आलेल्या महादेव जानकर यांनी आरक्षणाविषयची आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. ज्या त्या समाजाचे सामाजिक आरक्षण त्यांना मिळालेच पाहिंजे याचा अर्थ एकाचे काढून दुस-याला आरक्षण मिळावे असा होत नाही. मराठा समाजाच्या तरुणांनी देखील आरक्षणाची मागणी करण्याबरोबरच आत्मचिंतन करून आपण उद्योजक कसे होऊ तसेच स्पर्धा परीक्षांमधून आयएएस, आयपीएस होण्याचाही विचार करून प्रगती साधली पाहिजे असेही जानकर म्हणाले. 
 
कोपर्डी प्रकरण निश्चितच अन्यायकारक आहे. खरेतर गुन्हेगाराला कोणतीही जात नसते, त्यांना जातीशी जोडता कामा नये, मात्र गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे. मराठा समाजाचे मोर्चे हे दलितांच्या विरोधातील नाहीत, फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा महाराष्ट्राला  आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वरांची ही भूमी आहे. त्यामुळे कुठेही या मोर्चांवरून गैरसमज होणार नाहीत. जर कुणी याप्रकरणी विष कालवायचा प्रयत्न करीत असेल त्याचा बंदोबस्त करण्यास शासन सक्षम आहे असेही जानकर म्हणाले.

Web Title: Get reservation for Maratha community - Mahadev Jankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.