भाजपाच्या जागा सोडवून घ्या
By admin | Published: July 24, 2014 02:07 AM2014-07-24T02:07:33+5:302014-07-24T02:07:33+5:30
भाजपाचे उमेदवार सतत पराभूत होत असलेल्या जागा शिवसेनेला सोडवून घ्या, अशी मागणी मराठवाडय़ातील प्रत्येक जिल्हय़ातून आलेल्या पदाधिका:यांनी केली.
Next
औरंगाबाद : भाजपाचे उमेदवार सतत पराभूत होत असलेल्या जागा शिवसेनेला सोडवून घ्या, अशी मागणी मराठवाडय़ातील प्रत्येक जिल्हय़ातून आलेल्या पदाधिका:यांनी केली. पदाधिका:यांच्या या प्रश्नाची अगोदरच माहिती असावी, या अविर्भावात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘जागा सोडवून घेऊ; परंतु त्या बदल्यात भाजपाला कोणती जागा सोडावी, हे सांगा’ असा प्रतिप्रश्न केल्यामुळे पदाधिकारी निरुत्तर होऊन बाहेर येत होते.
विधानसभेच्या पाश्र्वभूमीवर मराठवाडय़ातील शिवसेनेचे खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख व उपशहरप्रमुख या निवडक पदाधिका:यांच्या भेटी घेऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांची मते जाणून घेतली.
नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बीड, जालना, लातूर व औरंगाबाद या सर्वच जिल्ह्यांतून मतदारसंघ सोडवून घेण्याची जोरदार मागणी पदाधिका:यांनी केली. मराठवाडय़ातील विधानसभेच्या 46 जागांपैकी 27 जागा शिवसेना व 19 जागा भाजपाकडे आहेत. या बैठकीत 1क् जागा अधिकच्या सोडवून घेण्याची मागणी पदाधिका:यांनी केली. (प्रतिनिधी)
गृहखाते दुर्बल बनले
दाभोलकरांच्या खुन्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्लॅन्चेटमुळे उपस्थित झालेला वाद दुर्दैवी व हास्यास्पद आहे. सध्या राज्याचे गृहखाते दुर्बल झाले असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथे केली़ मराठवाडय़ातील शिवसेनेच्या पदाधिका:यांची मते जाणून घेण्यासाठी ते बुधवारी दुपारी औरंगाबादेत आले होते.
नेत्यांसमोरच शिवसैनिकांमध्ये जुंपली
बुलडाणा : शहरात बुधवारी पक्षाचे उपनेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा झाला़ त्यानंतर विश्रमगृहावर गेलेल्या कदम यांच्यासमोरच शिवसैनिकांमध्ये हमरीतुमरी झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांना पाचारण केले. भगव्या सप्ताहानिमित्त बुलडाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात शिवसेनेचा मेळावा झाला. मेळाव्यात आघाडी सरकारवर टीका करीत कदम म्हणाले, आघाडी सरकारने पंधरा वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले; मात्र या राज्याला प्रगतीपथावर नेण्याऐवजी अधोगतीकडे नेले. महागाई, भ्रष्टाचार, घोटाळे करून या सरकारने जनतेच्या पैशावर डल्ला मारला.