विमानतळाजवळील ‘त्या’ इमारती २ महिन्यात पाडा

By Admin | Published: April 13, 2017 12:33 AM2017-04-13T00:33:11+5:302017-04-13T00:33:11+5:30

उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विमानतळाजवळील १00 इमारतींना हटवा किंवा इमारतींची उंची कमी करा असा आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने डीजीसीए

Get 'those' buildings near the airport for 2 months | विमानतळाजवळील ‘त्या’ इमारती २ महिन्यात पाडा

विमानतळाजवळील ‘त्या’ इमारती २ महिन्यात पाडा

googlenewsNext

मुंबई : उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विमानतळाजवळील १00 इमारतींना हटवा किंवा इमारतींची उंची कमी करा असा आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने डीजीसीए, मुंबई महापालिका आणि विमानतळ प्राधिकरणाला (एएआय) दिला. उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इमारती विमानांसाठी मोठा धोका असल्याने याबाबत कठोरपणे निर्णय घ्यायला हवा, असे न्या.व्ही.एम.कानडे व सी.व्ही.भडंग यांच्या खंडपीठाने म्हंटले.
विकासक किंवा या इमारतीतील रहिवाशांबाबत वाईट वाटून घेण्यास अर्थ नाही. प्रशासन निव्वळ बसून एखाद्या अपघात घडण्याची वाट पाहू शकत नाही, तसेही खंडपिठाने म्हंटले.
मुंबई विमानतळ प्राधिकरणाने (एमआयएएल) २0१0 व २0११ मध्ये विमनातळाच्या आजूबाजूच्या इमारतींचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणानुसार विमानतळासाठी ११0 इमारती अडथळा ठरत आहेत. बेकायदेशीरपणे उंची वाढवल्यासंदर्भात डीजीसीएने यापूर्वीच संबंधित विकासकांना व इमारतींना नोटीस बजावली आहे. मात्र त्या अंतिम नोटीस नाही. परंतु बुधवारी उच्च न्यायालयाने डीजीसीएला दोन महिन्यात ही प्रक्रीया पूर्ण करण्याचे आदेश दिले.
२0१५ व २0१६ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार ज्या ३१७ इमारती अडथळा ठरत आहे, त्या इमारतींनाही पुढील तीन महिन्यात हटवण्यासंदर्भात किंवा उंची कमी करण्यासंदर्भात अंतिम आदेश देण्याचे निर्देशही
उच्च न्यायालयाने दिले. या याचिकेवरील पुढील सुनावणी
२७ एप्रिल रोजी ठेवण्यात आली
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Get 'those' buildings near the airport for 2 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.