‘घाणेकर’ सुरू होणार सहा महिन्यांनी
By admin | Published: June 10, 2016 03:12 AM2016-06-10T03:12:30+5:302016-06-10T03:12:30+5:30
पालिकेने आता या कामाचा प्रस्ताव तयार केला असून या कामाला २४ लाख ८३ हजारांचा खर्च येणार आहे
ठाणे- पालिकेने आता या कामाचा प्रस्ताव तयार केला असून या कामाला २४ लाख ८३ हजारांचा खर्च येणार आहे. हा प्रस्ताव आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार असून त्यांनी मंजुरी दिल्यानंतर याची निविदा काढली जाणार आहे. त्यानंतर, स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे.
या सर्व प्रक्रियेला आणखी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतर, दुरुस्तीचे काम सुरू होईल, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
आताच दीड महिना नाट्यगृह बंद असल्याने नाट्यप्रेमींचे नुकसान झाले असताना आता त्यात आणखी चार महिन्यांची भर पडणार आहे. एकूणच पालिकेच्या या सावळ्या गोंधळामुळे घाणेकर नाट्यगृहाचा पडदा उठण्यास सहा महिन्यांचा कालावधी जाणार आहे.
डॉ. घाणेकर नाट्यगृहातील फॉल्स सिलिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर तेथील विदारक परिस्थिती मांडणारे वार्तांकन ‘लोकमत’ने २८ एप्रिलच्या अंकात ‘रिपोर्टर आॅन दी स्पॉट’ या वृत्तमालिकेत केले होते.