दिवाळीत मेळघाटात भरणार ‘घुंगरू बाजार’
By admin | Published: October 24, 2016 07:47 PM2016-10-24T19:47:17+5:302016-10-24T19:47:17+5:30
मेळघाटात फार पूर्वीपासून कोरकू, गोंड, भिलाल या आदिवासी जमाती वास्तव्य करीत आहेत. दिवाळी हा सर्वात मोठा सण साजरा करताना हे आदिवासी बांधव पायात घुंगरू बांधून बासरी व ढोलकीच्या तालावर
Next
राम देशपांडे / ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 24 - मेळघाटात फार पूर्वीपासून कोरकू, गोंड, भिलाल या आदिवासी जमाती वास्तव्य करीत आहेत. दिवाळी हा सर्वात मोठा सण साजरा करताना हे आदिवासी बांधव पायात घुंगरू बांधून बासरी व ढोलकीच्या तालावर प्रत्येक आठवडी बाजारात जाऊन नृत्य दीपोत्सवाचे स्वागत करतात. आदिवासी बांधवांची ही अनोखी परंपरा व त्यांची जीवनशैली जतन करण्यासाठी ६ नोव्हेंबर रोजी मेळघाटातील ग्राम लवादा येथील ग्राम ज्ञानपीठात ‘घुंगरू बाजार’ भरणार आहे.
सातपुड्याच्या शेवटचे टोक म्हणजे मेळघाट. ७0 टक्क्यांहून अधिक वन असलेल्या मेळघाटात पुरातन काळापासून आदिवासींच्या विविध जमाती वास्तव्यास आहे. शहरी संस्कृतीपासून लांब राहणाºया या आदिवासी बांधवांनी आपली स्वतंत्र परंपरा व संस्कृती जतन केली आहे. येथे वास्तव्यास असलेल्या गोंड (थाट्या) या आदिवासी जमातीचे बांधव दरवर्षी दीपोत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरी करतात. रानावनातील आणि अभयारण्यालगतच्या गावांमध्ये भरणाºया आठवडी बाजारात जाऊन घुंगरू नृत्य सादर केले जाते. दीपोत्सवाच्या स्वागताप्रीत्यर्थ पायात घुंगरू बांधून बासरी व ढोलकीच्या तालावर केल्या जाणाºया या नृत्याला ‘घुंगरू बाजार’ असे संबोधले जाते. उत्सव साजरा करण्याची आदिवासी बांधवांची ही अनोखी परंपरा, त्यांची संस्कृती आणि त्यांची जीवनशैली जनत करण्यासाठी संपूर्ण बांबू केंद्र असलेल्या ग्राम लवादा येथील ग्राम ज्ञानपीठाने पुढाकार घेतला आहे. आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे विक्री केंद्र असलेल्या ग्राम ज्ञानपीठात रविवार, ६ नोव्हेंबर रोजी ‘घुंगरू बाजार’आयोजित करण्यात आला आहे. आदिवासी बांधवांचा दीपोत्सव सजारा करण्याच्या अनोख्या शैलीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘घुंगरू बाजारा’चा निसर्गप्रेमींनी बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन ग्राम ज्ञानपीठाचे सुनील देशपांडे, सहदेवराव शनवारे व मारोती शनवारे यांनी केले आहे.