महाराष्ट्र गुजरात सीमेवर दिवाळीनिमित्त घोर नृत्योत्सव

By admin | Published: October 30, 2016 04:13 PM2016-10-30T16:13:27+5:302016-10-30T16:13:27+5:30

महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्याच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये दिवाळीनिमित्त घोर या नृत्योत्सवास प्रारंभ झाला आहे.

Ghar Nritya Festival on the border of Maharashtra Gujarat on Diwali | महाराष्ट्र गुजरात सीमेवर दिवाळीनिमित्त घोर नृत्योत्सव

महाराष्ट्र गुजरात सीमेवर दिवाळीनिमित्त घोर नृत्योत्सव

Next

 अनिरुद्ध पाटील/ ऑनलाइन लोकमत 

पालघर, दि. 30 - महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्याच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये दिवाळीनिमित्त घोर या नृत्योत्सवास प्रारंभ झाला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी या नृत्याला सुरुवात होऊन बलिप्रतिपदेला सांगता होते. येथील स्थानिक गुजराती भाषिक समाजात घोर नृत्योत्सवाला मानाचे स्थान असून हा आविष्कार पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक दाखल होतात. 
   घोर हे पारंपरिक वाद्य आहे. लोखंडी सळईच्या रिंगणात घुंगरू घातलेले वाद्य हाताच्या मुठीत घेऊन वाजविले जाते. हा पुरुषप्रधान नृत्य प्रकार असून,  जोडीदाराच्या साह्याने घोरीच्या तालावर दोन ते तीन प्रकारे फेर धरून नाच केला जातो. एका समूहात समूहात बारा ते पंधरा जोड्या असतात. डोक्यावर फेटा, अंगात बणीयान घातल्यानंतर छातीवर लुगड्यांच्या साह्याने नक्षीदार विणकाम करून त्यावर झेंडू फुलांच्या माळांनी पुरुषाला सजवले जाते.  तर डोळ्यात काजळ घातल्याने सौंदर्‍यात भर पडते. एका हातात दांडिया आणि  दुसर्‍या हातात मोरपंखाचा गुछा असतो, त्यांना घोरया म्हणतात. बगळी( 8 ते 10 फुट उंच बांबूच्या टोकावर कापडाने बनवलेली बगळ्यांची जोडी) मध्यभागी धरली जाते. कवया(गायक) पारंपरिक गाण्याच्या  तालावर दोन ते तीन प्रकारे नाच केला जातो. कवया गाणे गाताना गणपती, राम-कृष्ण आणि ग्रामदैवतांची स्तुतीपर कवण गातो.
 पारतंत्र्यकाळात इंग्रजां विरूद्ध स्वकीयांना जागृत करण्यासाठी तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतहि प्रेरणा देण्यासाठी गायली जात. घोर नृत्योत्सवाचा माध्यमातून कवया शाहिरांनी भूमिका बजावत असल्याची माहिती घोलवड येथील जयप्रकाश बारी या कवयाने लोकमतला दिली.  
 

 

Web Title: Ghar Nritya Festival on the border of Maharashtra Gujarat on Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.