समृद्धी महामार्गांवरील घाट मार्गातील बोगद्यांचं काम पूर्ण, ८ किमीचे दुहेरी बोगदे २ वर्षात पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 03:42 PM2021-09-18T15:42:13+5:302021-09-18T15:43:22+5:30

हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपुर समृध्दी महामार्गावर  शहापुर तालुक्यातील वाशाळा ते इगतपुरी च्या नांदगाव सदो  पर्यंतच्या ८ कीलोमीटर इतक्या लांब १७.५ मीटर रुंद असे दुहेरी बोगद्याचे काम पुर्ण

Ghat tunnels on Samrudhi Highway completed 8 km double tunnels completed in 2 years | समृद्धी महामार्गांवरील घाट मार्गातील बोगद्यांचं काम पूर्ण, ८ किमीचे दुहेरी बोगदे २ वर्षात पूर्ण

समृद्धी महामार्गांवरील घाट मार्गातील बोगद्यांचं काम पूर्ण, ८ किमीचे दुहेरी बोगदे २ वर्षात पूर्ण

Next

शाम धुमाळ

हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपुर समृध्दी महामार्गावर  शहापुर तालुक्यातील वाशाळा ते इगतपुरी च्या नांदगाव सदो  पर्यंतच्या ८ कीलोमीटर इतक्या लांब १७.५ मीटर रुंद असे दुहेरी बोगद्याचे काम पुर्ण झाले आहे. भारतातील सर्वात रुंद आणि चौथ्या क्रमांकाचा दुहेरी बोगद्या आहे. या महामार्गावर मुंबईला जाण्यासाठी व मुंबईहुन येण्यासाठी स्वतंत्र ८ कीलोमीटरचे दोन बोगदे तयार झाले आहेत. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावरील कसारा घाट भेदुन इगतपुरी जवळ हे बोगदे तयार करण्यात आले. 

या महामार्गांवरील पूर्णतवास गेलेल्या बोगद्याची रस्ते विकास महामंडळाचे अनिलकुमार् गायकवाड व उप जिल्हाधिकारी  तथा एम एस आर डी च्या प्रशासक रेवती गायकर यांनी अभियंत्या सोबत चाचणी व पाहणी केली.

दोन्ही बोगद्याची लांबी ८ कीलोमीटर असुन रुंदी १७.५ मीटर आहे. एफकॉन इंफ्रास्ट्रक्चर कंपनीचे प्रोजेक्ट व्यवस्थापक शेखर दास यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता शक्ती उपाध्याय, राजीव सिंह, एम. एन. राव, परीतकर, पारीख सर व त्यांच्या १५०० कामगार व १५० अभियंते अशा बाहुबली टीमने हे शिवधनुष्य पेलले. या बोगद्याने आणखी एक विक्रम नोंदवला तो म्हणजे ८ कीलोमीटरचा हा दुहेरी बोगदा फक्त २ वर्षात पुर्ण झाला. अभियांत्रिकीच्या इतिहासात भारतात तरी अशी नोंद नाही अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

५५ हजार कोटी रूपयांचा मुंबई नागपुर समृध्दी महामार्ग ७०० कीलोमीटरचा असुन इगतपुरीतील दुहेरी बोगदा हा या महामार्गाचा महत्वाचा टप्पा आहे. २७४५ कोटी रूपये खर्च करून हा बोगदा खोदण्यासाठी ऑस्ट्रेलियन तंत्राचा वापर करण्यात आला होता. कसारा घाट पार करण्यासाठी वाहतुक कोंडी नसेल तर आजच्या घडीला २० ते २५ मिनिटे लागतात. मात्र या बोगद्यातुन कसारा घाट पार करण्यासाठी केवळ ५ मिनिटे लागणार आहे. दोन वर्षात दुहेरी बोगद्याचे काम पुर्ण झाल्याने एफकॉन इंफ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अभियंत्यांनी आनंद व्यक्त केला. याच दरम्यान शहापूर ते इगतपुरी दरम्यान सुरु असलेल्या नवयुगा कंपनी च्या कामांची देखील पाहणी  अधिकाऱ्यांनी केली असून समाधान कारक सुरु असलेल्या कामामुळे ठाणे ते नाशिक जिल्यातील हा टप्पा वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Ghat tunnels on Samrudhi Highway completed 8 km double tunnels completed in 2 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.