घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटली

By Admin | Published: June 9, 2016 03:14 AM2016-06-09T03:14:45+5:302016-06-09T03:14:45+5:30

घाटकोपर येथील असल्फा परिसरातील ७२ इंची व्यासाची जलवाहिनी फुटल्याने बुधवारी रात्री एकच खळबळ उडाली.

Ghatkopar water pipelines | घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटली

घाटकोपरमध्ये जलवाहिनी फुटली

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ -  घाटकोपर येथील असल्फा परिसरातील ७२ इंची व्यासाची जलवाहिनी फुटल्याने बुधवारी रात्री एकच खळबळ उडाली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमध्ये लोकांच्या घरात पाणी घुसल्याने एकच हाहाकार माजला. दरम्यान, जमिनीच्या १० फूट खाली असलेली जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. तर रात्रीच्यावेळी घरात पाणी शिरल्याने स्थानिक रहिवाशीही तारांबळ उडाली होती. मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा कर्मचारी पवई येथील जलवाहिनीचा मुख्य पाणीपुरवठा बंद करण्यासाठी रवाना झाले होते. त्यानंतर जलवाहिनी
दुरूस्तीचे काम सुरू होणार होते.

Web Title: Ghatkopar water pipelines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.