कोल्हापुरात शिक्षकांनी घातला शासनाच्या नावानं ‘गोंधळ’

By admin | Published: June 9, 2016 05:55 AM2016-06-09T05:55:29+5:302016-06-09T05:55:29+5:30

शिक्षकांनी ‘राज्य शासनाच्या, मुख्यमंत्र्यांच्या, शिक्षण, अर्थमंत्र्यांच्या नावानं चांगभलं,’ म्हणत प्रतीकात्मक गोंधळ घालून अभिनव आंदोलन केले.

'Ghaushal' in the name of the government in Kolhapur | कोल्हापुरात शिक्षकांनी घातला शासनाच्या नावानं ‘गोंधळ’

कोल्हापुरात शिक्षकांनी घातला शासनाच्या नावानं ‘गोंधळ’

Next


कोल्हापूर : अनुदानपात्र शाळा आणि वर्गतुकड्यांना अनुदान द्यावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी शिक्षकांनी ‘राज्य शासनाच्या, मुख्यमंत्र्यांच्या, शिक्षण, अर्थमंत्र्यांच्या नावानं चांगभलं,’ म्हणत प्रतीकात्मक गोंधळ घालून अभिनव आंदोलन केले.
अनुदानपात्र ठरलेल्या शाळा व वर्गतुकड्यांना त्वरित वेतन व अनुदान शासनाकडून मिळावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण सुरू आहे. आंदोलनाच्या आठव्या दिवशी बुधवारी शिक्षकांनी शासनाच्या नावानं देवीची प्रतीकात्मक पूजा मांडून गोंधळ घातला. आंदोलनकर्त्या काही शिक्षकांनी गोंधळी व त्यांच्या सहकाऱ्यांसारखा पेहराव करून, संबळ वाजवून गोंधळ घातला. मागण्या मान्य केल्याचा शासकीय आदेश निघेपर्यंत आंदोलनाद्वारे लढा सुरूच ठेवणार असल्याचे कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Ghaushal' in the name of the government in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.