घरकुल योजनेत मंगळवेढा तालुका पुणे विभागात तृतीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 03:42 PM2019-07-16T15:42:31+5:302019-07-16T16:12:55+5:30
सातारा जिल्ह्यातील जावळी प्रथम तर सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ व्दितीय स्थानावर
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत राबविण्यात येणाºया प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत मंगळवेढा तालुका पुणे विभागात तिसºया क्रमांकावर आला असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यभरात राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेची यादी जाहीर केली आहे. पुणे विभागात येणाºया सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील विविध योजनेच्या घरकुल बांधणीचा आढावा ग्रामविकास विभागाने मंगळवारी प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील जावळी, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ आणि त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याने क्रमांक पटकावला आहे.
मंगळवेढा तालुक्यासाठी २ हजार २६४ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट होते त्यापैकी २ हजार ५२ घरकुल पूर्ण झाले आहेत़ घरकुल बांधण्याचे टारगेट वरील दोन तालुक्यापेक्षा मंगळवेढा तालुक्याचे जास्त आहे़ जवली येथे १२८ घरकुल तर कवठेमहांकाळ येथे ६०५ घरकुल पूर्ण झाले आहेत. त्याचबरोबर पाचव्या क्रमांकावर सांगोला सहाव्या क्रमांकावर बार्शी आणि सातव्या क्रमांकावर माळशिरस तालुका आहे़ तालुकानिहाय बांधलेले घरकुले पुढीलप्रमाणे आहेत. सांगोला: २२४४ ( उदिष्ट: २५५०), बार्शी: ५३९ (६०१), माळशिरस: २२६७ (२६०९) इतर तालुक्यांचे क्रमांक असे. क्रमांक: १२, पंढरपूर घरकुल उद्दिष्ट:१४३६, बांधणी १२४५, १३ वा क्रमांक करमाळा: घरकुल उद्दिष्ट: १३१८, बांधणी: ११५५, १५ वा क्रमांक अक्कलकोट उद्दिष्ट: १५१६ बांधणी: १२१३.