ठाण्यात होणार गुलाम अलींचा कार्यक्रम
By admin | Published: January 17, 2016 04:09 PM2016-01-17T16:09:44+5:302016-01-17T16:18:16+5:30
प्रसिध्द पाकिस्तानी गझल सम्राट गुलाम अलींचा फेब्रुवारी महिन्यात ठाण्यात गझल गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १७ - प्रसिध्द पाकिस्तानी गझल सम्राट गुलाम अलींचा फेब्रुवारी महिन्यात ठाण्यात गझल गायनाचा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानतर्फे आयोजित ठाणे महोत्वसात गुलाम अलींचा गझल गायनाचा कार्यक्रम होणार आहे. गुलाम अलींनी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी टि्वटरवरुन दिली.
गुलाम अलींच्या या कार्यक्रमावरुन आतापासूनच ठाण्यामध्ये राजकीय वादावादी, आव्हान-प्रतिआव्हानाला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानी कलाकरांचे महाराष्ट्रात कार्यक्रम आयोजित करायला शिवसेनेचा प्रखर विरोध असून, मागच्यावर्षी शिवसेनेच्या विरोधामुळे गुलाम अलींचा मुंबईतील कार्यक्रम रद्द करावा लागला होता.
ठाण्यात आतापासूनच या कार्यक्रमावरुन शिवसेना आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये वादावादी सुरु झाली आहे. शिवसेनेला जे करायचय ते करुं दे अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे तर, आव्हाडांनी कार्यक्रम करुन दाखवावा अस प्रतिआव्हान शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलं आहे.
Welcome ...a evening with GAzAl KiNg #GhulamAlipic.twitter.com/nCvgnUdsW0
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 17, 2016