जिया आत्महत्या : सूरजला पासपोर्ट नको
By Admin | Published: March 10, 2016 03:39 AM2016-03-10T03:39:26+5:302016-03-10T03:39:26+5:30
बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या सूरज पांचोलीने पासपोर्ट मिळवण्यासाठी केलेल्या अर्जावर सीबीआयने आक्षेप घेतला
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या सूरज पांचोलीने पासपोर्ट मिळवण्यासाठी केलेल्या अर्जावर सीबीआयने आक्षेप घेतला.
सूरज पांचोलीच्या अर्जावर उत्तर देण्यासाठी सीबीआयला वेळ हवा आहे. मात्र, या अर्जास सीबीआयचा विरोध आहे,
असे सीबीआयचे वकील
हितेन वेणेगावकर यांनी न्या.
मृदुला भाटकर यांना सांगितले.
‘कायमस्वरूपी पासपोर्ट परत करण्यास आमचा आक्षेप आहे. जियाची आई राबिया खान यांनी सूरजविरुद्ध जियाची हत्या केल्याचा आरोप नोंदवण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केली
आहे. अशा परिस्थितीत आरोपीला कायमस्वरूपी पासपोर्ट परत देणे योग्य ठरणार नाही,’ अशी
माहिती अॅड. वेणेगावकर यांनी
न्या. भाटकर यांना दिली.
हा गुन्हा भारतात घडला
आहे. त्यामुळे हे न्यायालय
आदेश देऊ शकते, असे म्हणत, न्या. भाटकर यांनी सीबीआयला गुरुवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले, तसेच न्या. भाटकर
यांनी राबिया खान यांना या याचिकेत मध्यस्थी करण्यास नकार दिला.
‘या केसमध्ये आरोपी त्याचा पासपोर्ट मागत आहे. त्यामुळे अशा केसमध्ये तक्रारदाराला (राबिया खान) मध्यस्थी करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही,’ असेही न्या. भाटकर यांनी म्हटले.
(प्रतिनिधी)