जव्हार कुटीर रुग्णालयाला विखे-पाटील यांनी दिली भेट

By Admin | Published: September 18, 2016 04:40 AM2016-09-18T04:40:03+5:302016-09-18T04:40:03+5:30

विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी त्यांच्या घरी जावून त्यांचे सांत्वन केले.

The gift given by Vikhe-Patil to the Jawhar Kutir Hospital | जव्हार कुटीर रुग्णालयाला विखे-पाटील यांनी दिली भेट

जव्हार कुटीर रुग्णालयाला विखे-पाटील यांनी दिली भेट

googlenewsNext

हुसेन मेमन,

जव्हार- मोखाडा तालुक्यात कुपोषणाचे बळी ठरलेल्या दोन बालकांच्या कुटुंबियांचे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी त्यांच्या घरी जावून त्यांचे सांत्वन केले. तसेच मोखाडा व जव्हार तालुक्याचा दौराही केला आणि रुग्णालयांनाही भेटी दिल्या.
विखे-पाटील यांनी सकाळी ९.०० ला भेट दिली तर धनंजय मुंडे यांनी ११.३० च्या सुमारास भेट देऊन जव्हार कुटीर रूग्णालयाला भेट देऊन पाहाणी केली.
मात्र कुटीर रूग्णालयात दाखल झालेल्या मुलांना उपचार मिळत असल्यामुळे आठवड्याभरात सॅम मॅम च्या बालकांना सुदृढ करून सुट्टी दिली जात असल्याचे कुटीर रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. रामदास मराड यांनी सांगितले. तसेच रूग्णालयात एकूण ८ बालके सॅम मॅमची असून त्यांच्यावरही नियमित उपचार सुरू असून लवकरच त्यांनाही सुखरूप घरी पाठविले जाईल, अशी माहिती डॉ.मराड यांनी दिले. यावेळी आय कॉग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत, जिल्हाध्यक्ष मनिष गणोरे, भरत बेंद्रे, सरचिटणिस संदिप मुकणे, विनीत मुकणे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर धनंजय मुंडे यांच्या दौऱ्यात आमदार आनंदभाई ठाकूर, आमदार पांडूरंग बरोरा, आमदार निरंजन डावखरे, उपस्थित होते.
>आदिवासी विकासमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!
पालघर : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कुपोषण बळी प्रकरणी राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पालकमंत्री विष्णू सवरा यांनी राजीनामा द्यावा अथवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी केली आहे.

Web Title: The gift given by Vikhe-Patil to the Jawhar Kutir Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.