महिलादिनाच्या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी दाखवले भेटवस्तूंचे आमिष

By admin | Published: March 9, 2017 09:28 AM2017-03-09T09:28:51+5:302017-03-09T09:28:51+5:30

मीरा भार्इंदर महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्याकरीता महिलांना नास्ता भेटवस्तूचे आमिष दाखवण्यात आले.

Gifts of gifts presented to gather crowds during a women's day program | महिलादिनाच्या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी दाखवले भेटवस्तूंचे आमिष

महिलादिनाच्या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी दाखवले भेटवस्तूंचे आमिष

Next

 

मीरारोड/ठाणे, दि. ९ -  मीरा भार्इंदर महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्याकरीता महिलांना चक्क नाश्ता, भेटवस्तुचे आमिष दाखवुन बोलावण्याचा प्रकार सत्ताधारी भाजपाच्या चांगलाच अंगलट आला. मुला - बाळांसह तीन तीन तास ताटकळलेल्या अनेक महिलांना भेटवस्तु तर सोडाच अल्पोपहार व पाणी सुध्दा मिळाला नाही. महिलांना धक्काबुक्की करुन गोंधळ घालण्यात आला. मात्र हे सर्व घडत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.

महिला दिनाच्या कार्यक्रमाचे समितीच्यावतीने आयोजन करण्यात आले असताना अगदी स्थळ ठरवण्यापासुन सर्व कार्यक्रमावर भाजपाच्या एका पुरुष नेत्याचीच लुडबुडची चर्चा रंगली होती. पालिकेच्या पत्रिकेत व बॅनरवर शिवसेना खासदार राजन विचारेंना बाजूला सारले. भाजपाच्या महापौर गीता जैन यांनीच आयुक्तांना पत्र देउन निमंत्रण पत्रिकेत शिष्टाचार पाळला नाही म्हणुन बेजबाबदार अधिकारयांवर कारवाईची मागणी केली . बॅनरवर समितीच्या ६ महिला नगरसेविकांची छायाचित्रे डावलण्यात आली. आमदार सरनाईक यांनाही निमंत्रण देण्यात आले नाही. 

यावरुन वादविवाद सुरु असतानाच भाजपाकडुन चक्क सदर पालिका कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका पक्षाच्या नावे छापण्यात आल्या. शिवाय त्यांच्या नगरसेवक, पदाधिकारयांना पालिकेच्या नावाने बोधचिन्ह असलेली गिफ्ट कुपन वाटण्यात आली. यामुळे कार्यक्रम पालिकेचा का भाजपाचा ? असा सवाल केला जाऊ लागला. गिफ्ट कुपन परस्पर छापुन भाजपाच्या नगरसेविका, पदाधिकारी आदींना वितरीत करण्यात आले. त्यांच्या मध्यमातून ती कुपन महिलांना देण्यात आली होती.

शिवसेनेने तर मंगळवारी आयुक्त डॉ. नरेश गीते यांची भेट घेऊन तक्रार केली. पण आयुक्तांनी काहीच कार्यवाही न केल्याने आज बुधवारी शिवसेनेने आयुक्त दालना बाहेर काळे झेंडे व निषेधाचे फलक दाखवत संताप व्यक्त केला. परंतु आयुक्तांसह उपायुक्त आदी कोणीच दालनात नसल्याने शिवसैनिकांनी विभागाचे अधिकारी दामोदर संखे व गोविंद परब यांना घेराव घालुन जाब विचारला. तोच उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे दालनात आल्याचे कळताच मोर्चा त्यांच्या दालनाकडे वळला.

उपमहापौर प्रविण पाटील, स्थायी समिती सभापती प्रभाकर म्हात्रे, गटनेत्या निलम ढवण, उपसभापती शुभांगी कोटीयन, महिला उपजिल्हा संघटक स्रेहल सावंत, वैशाली खराडे सह नगरसेवक संध्या पाटील, तारा घरत, जयमाला पाटील, जयंतीलाल पाटील, प्रणाली पाटील, शहर प्रमुख धनेश पाटील, प्रशांत पालांडे सह मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी उपायुक्तांना घेराव घातला. उपायुक्तांना कुपन दाखवत गुन्हा दाखल करा, महिलांची फसवणुक व भेदभाव चालणार नाही, कार्यक्रम रद्द करा अशी मागणी करत निवेदन दिले. उपायुक्तांनी देखील पालिकेने कुपन न छापल्याची कबुली दिली.

पालिकेतुन शिवसैनिकांचे आदोलन थेट मैदानावर आले. मैदाना बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. या वेळी पोलिसांनी शिवससेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कारवाईचा इशारा दिल्याने ते सर्व संतप्त झाले. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या महिलांनी तर आक्रमक पावित्रा घेतला. अनेकजण संतप्त होऊन नाराजी व्यक्त करत होते.

सायंकाळपासुन मुला बाळांसह आलेल्या महिलांनी तर पाणी, नाश्ता नाही म्हणुन निषेध करत आपली नाराजी व्यक्त केली. अल्पोपहाराची पाकिटं, पाणी व भेट वस्तु मिळत नसल्याने महिला चांगल्याच खवळल्या होत्या. त्यांची भाजपा कार्यकर्ते तसेच पालिकेच्या खाजगी सुरक्षां सोबत चांगलीच धक्काबुक्की व बाचाबाची झाली. ३ -३ तास ताटकळलेल्या महिलांनी कार्यक्रमातुन काढता पाय घेण्यास सुरवात केल्याने त्यांना थांबवण्यासाठी स्वत: भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी लोकांना भाषणातुन गिफ्ट देण्याचे आश्वासन दिले.

परंतु महिला संतप्त झाल्याने त्यांचे पालिका व भाजपाच्या लोकांशी जोरदार खटके उडु लागले. पोलिसांनी पालिका कार्यक्रमात गिफ्ट वाटणारयांना मोकाट सोडत ऊलट महिलांनाच रोखले. महिला दिनी सन्मान तर दुरच उलट फसवणुक केल्याची भावना महिलांनी बोलुन दाखवली. त्यातच भेटवस्तुचे वाटाप करण्यास घेतले असता महिलांची एकच झुंबड उडुन गोधळ झाला.

विशेष म्हणजे पालिकेच्या आयुक्तां पासुन एकही उपायुक्त पालिकेचा कार्यक्रम असुन देखील उपस्थित नव्हता.
प्रतिनिधी
 

Web Title: Gifts of gifts presented to gather crowds during a women's day program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.