विदर्भातील जिनिंग-प्रेसिंग उद्योगाला घरघर!

By admin | Published: April 23, 2015 02:17 AM2015-04-23T02:17:36+5:302015-04-23T02:17:36+5:30

शेतक-यांची कोंडी; कापसावर आधारित प्रकल्पांची प्रतीक्षा

Ginger-pressing industry in Vidarbha home! | विदर्भातील जिनिंग-प्रेसिंग उद्योगाला घरघर!

विदर्भातील जिनिंग-प्रेसिंग उद्योगाला घरघर!

Next

राजरत्न सिरसाट/ अकोला : राज्यातील कापसाच्या एकूण क्षेत्रापैकी अर्धे म्हणजे साधारणपणे १५ लाख हेक्टरवर क्षेत्र विदर्भात असूनही येथील सहकारी जिनिंग-प्रेसिंगची संख्या झपाट्याने घटली असून, उर्वरित उद्योगांना घरघर लागली आहे. विदर्भात सध्या केवळ जिनिंग युनिटच शिल्लक आहेत. कापसावर आधारित मोठे प्रकल्पही येथे येत नसल्याने कापूस उत्पादक शेतकर्‍यांची कोंडी होत आहे. विदर्भात धान आणि त्यानंतर कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक. परंतु या पिकांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कापसाच्या भरघोस उत्पादनामुळे येथे सहकारी तत्त्वावर ७६२ जिनिंग-प्रेसिंग मिल सुरू झाल्या. मात्र सध्या कागदावर त्यांची संख्या ४१७ पर्यंत खाली आली आहे. कापूसपट्टय़ात जिनिंग-प्रेसिंगची संख्या झपाट्याने घसरत असल्याचे सर्वांनाच आश्‍चर्य आहे. एकीकडे या भागातील सहकारी जिनिंग-प्रेसिंग बंद पडत आहेत आणि दुसरीकडे कापूस निर्यातीबाबत शासनाचे धोरणही शेतकर्‍यांना साथ देत नसल्याचे चित्र आहे. भारत कापूस निर्यातीत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे; पण सरकारच्या बोटचेप्या धोरणाचा शेतकर्‍यांना फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कापूस ते कापड निर्मिती साखळी निर्माण करण्याचा जो उद्देश होता, तो केव्हाच निकालात निघाला असल्याचे सांगीतले. विदर्भातील सहकारी जिनिंग-प्रेसिंगला अखेरची घरघर लागली आहे. कापूस विदर्भात आणि सूत गिरण्या भलतीकडेच असे सध्याचे चित्र आहे. आजमितीस ४0 ते ५0 टक्के जिनिंग-प्रेसिंग बंद असून, सूत गिरण्या तर नाहीतच, अशी स्थिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Ginger-pressing industry in Vidarbha home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.