Girish Bapat: "गिरीश बापट यांचे पक्ष उभारणीतील योगदान न विसरता येण्याजोगे"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 07:02 PM2023-03-29T19:02:08+5:302023-03-29T19:02:47+5:30

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाहिली आदरांजली

Girish Bapat contribution in BJP party building is unforgettable says Chandrashekhar Bawankule express condolences | Girish Bapat: "गिरीश बापट यांचे पक्ष उभारणीतील योगदान न विसरता येण्याजोगे"

Girish Bapat: "गिरीश बापट यांचे पक्ष उभारणीतील योगदान न विसरता येण्याजोगे"

googlenewsNext

Girish Bapat: खासदार गिरीश बापट यांचे पक्षाच्या उभारणीतील योगदान न विसरता येण्याजोगे आहे. त्यांच्या निधनाने पक्षाची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खा. बापट यांना आदरांजली वाहिली. पुण्यातील कसबाचे खासदार भाजपा ज्येष्ठ नेते गिरीष बापट यांचे आज निधन झाले. चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्रीपद भूषवले. पुण्याच्या राजकारणात गिरीष बापट यांची चांगली पकड होती.

बावनकुळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, "अफाट जनसंपर्क, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असलेली कटीबद्धता यामुळे गिरीश बापट यांनी पुणे शहराच्या राजकारणात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. कसबा विधानसभा मतदार संघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या बापट यांनी सामान्य जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावून आदर्श लोकप्रतिनिधी कसा असतो हे दाखवून दिले."

"खा. बापट यांना पुण्याच्या समस्यांची नेमकी जाण होती या समस्या सोडवण्यासाठी ते सातत्याने कार्यरत असत. जनसेवेचा अखंड ध्यास घेतलेल्या बापट यांनी पक्षनिष्ठेला सर्वोच्च महत्व दिले. पक्षाने दिलेल्या आदेशांचे शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे पालन करणाऱ्या बापट यांनी सामान्य माणसांच्या समस्या सोडवण्यासाठी विधिमंडळ, महापालिका या व्यासपीठांचा प्रभावी वापर केला पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी सदैव स्मरणात राहील," अशा भावना बावनकुळे यांनी व्यक्त केल्या.

Web Title: Girish Bapat contribution in BJP party building is unforgettable says Chandrashekhar Bawankule express condolences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.