एकनाथ शिंदे यांच्याशी भेटीनंतर भाजपाचे 'संकटमोचक' गिरीश महाजन म्हणाले- "आज मी मुद्दामून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 10:14 PM2024-12-02T22:14:47+5:302024-12-02T22:15:33+5:30

Girish Mahajan Eknath Shinde Meeting in Thane, Mahayuti Maharashtra Political Crisis : "मी त्यांच्या भेटीसाठी तीन-चार दिवसांपूर्वीच वेळ मागितली होती, पण ते त्यावेळेस गावी निघून गेले", असेही महाजन म्हणाले.

Girish Mahajan meets Eknath Shinde in Thane Residence amid Mahayuti Maharashtra Political Crisis no political discussions said BJP leader | एकनाथ शिंदे यांच्याशी भेटीनंतर भाजपाचे 'संकटमोचक' गिरीश महाजन म्हणाले- "आज मी मुद्दामून..."

एकनाथ शिंदे यांच्याशी भेटीनंतर भाजपाचे 'संकटमोचक' गिरीश महाजन म्हणाले- "आज मी मुद्दामून..."

Girish Mahajan Eknath Shinde Meeting in Thane, Mahayuti Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळूनही मुख्यमंत्रि‍पदाबद्दल विविध चर्चा सुरु आहेत. नव्या सरकारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री होणार असल्याने सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचीही चर्चा काही दिवसांपासून रंगलेली आहे. तशातच प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत शिंदे गेल्या ३-४ दिवसात अनेकांना भेट नाकारत होते. मात्र आज भाजपाचे 'संकटमोचक' अशी ओळख असलेले गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी त्यांनी भेटण्यासाठी आल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. शिंदे-महाजन यांच्यात नेमकी काय चर्चा होणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष होते. त्यानुसार, शिंदेंशी बैठक संपल्यानंतर गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळीत त्यांनी काही महत्त्वाची माहिती दिली.

मी मुद्दामून येथे प्रकृतीच्या चौकशीसाठी आलो, त्यांच्या हाताला अद्यापही सलाईन आहे!

"गेल्या पाच-सहा दिवसांपासून एकनाथ शिंदे यांना यांची प्रकृती खराब आहे. त्यांना घशाला इन्फेक्शन झालेले आहे. तसेच थोडा तापही आहे. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी आज खास येथे त्यांच्या भेटीला आलो होतो. मी त्यांच्या भेटीसाठी तीन-चार दिवसांपूर्वीच वेळ मागितली होती, पण ते त्यावेळेस गावी निघून गेले. त्यानंतर माझा आणि त्यांचा संपर्क होऊ शकलेला नव्हता. पण आज मी मुद्दामून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी येथे आलो होतो. ते लवकर बरे होऊन कामकाजाला सुरुवात करतील अशी मला अपेक्षा आहे. सध्या त्यांच्या हाताला सलाईन लावलेले आहे परंतु त्यांची प्रकृती सुधारत आहे," असे महाजन यांनी सांगितले.

पाच तारखेच्या शपथविधीला आम्ही एकत्र दिसू!

"शपथविधीला महायुतीचे सर्व लोक नक्कीच एकत्र दिसतील. महायुतीचे सर्व निर्णय हे एकत्रितपणे घेतले जाणार आहेत. पाच तारखेचा शपथविधी हा अतिशय दिमाखदार असेल. त्यात आम्ही सर्वजण सोबत असू. महायुतीमध्ये सारं आलबेल आहे, सगळं ठीक आहे. आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. एकनाथ शिंदे यांनी देखील दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल सांगितले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितल्यामुळे मला वेगळे काही सांगण्याची गरज वाटत नाही. आमच्यामध्ये मनभेद, मतभेद किंवा मतमतांतरे आहेत या सर्व अफवा आहेत. यात कोणतेही तथ्य नाही. शिंदे यांचे मत अतिशय प्रामाणिक आणि स्वच्छ आहे. शपथविधी बाबत आमची सर्वांची तयारी सुरू आहे," असेही ते यावेळी म्हणाले.

लवकरच शिंदे कामकाज सुरु करतील, बैठका घेतील!

"आगामी काळातील काही शासकीय कार्यक्रमांच्या बैठका नियोजित आहेत, त्या बैठका एकनाथ शिंदे घेतील असे त्यांनी मला सांगितले आहे. उद्या शिंदे यांच्या तब्येतीत आणखी सुधारणा होईल आणि त्यानंतर ते शासकीय बैठकाही घेतील असा अंदाज आहे. ते काळजीवाहू मुख्यमंत्री असल्यामुळे नक्कीच बैठकही घेतील आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत. माझी त्यांच्याशी कोणतेही राजकीय चर्चा झाली नाही. कुणाला कोणती मंत्रिपदे मिळावी, कोणाला कुठली खाती मिळावी याबाबतच्या कुठल्याही चर्चा आमच्यात झाल्या नाहीत. मी केवळ त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी येथे आलो होतो. मंत्रीपद किंवा खातेवाटप हे निर्णय वरिष्ठ पातळीवर होतील. आम्ही राजकीय चर्चांबाबत एकही शब्द बोललो नाही," असे गिरीश महाजन यांनी पत्रकारांना सांगितले.

Web Title: Girish Mahajan meets Eknath Shinde in Thane Residence amid Mahayuti Maharashtra Political Crisis no political discussions said BJP leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.