काकाने विनयभंग केल्याने धुळ्यात मुलीची आत्महत्या

By Admin | Published: March 21, 2017 03:28 AM2017-03-21T03:28:34+5:302017-03-21T03:28:34+5:30

सख्ख्या काकानेच विनयभंग केल्याने अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना मेथी येथे घडली आहे.

Girl committed suicide due to molestation by Kaka | काकाने विनयभंग केल्याने धुळ्यात मुलीची आत्महत्या

काकाने विनयभंग केल्याने धुळ्यात मुलीची आत्महत्या

googlenewsNext

धुळे : सख्ख्या काकानेच विनयभंग केल्याने अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना मेथी येथे घडली आहे. आईने दिलेल्या फिर्यादीनंतर नऊ जणांवर गुन्हा नोंदवून पोलिसांनी मुलीच्या वडिलांसह सात जणांना अटक केली आहे.
दीक्षा आगळे (१५) हिने १४ मार्चला पेटवून घेत आत्महत्या केल्यानंतर तिचा परस्पर अंत्यविधी उरकून पुरावा नष्ट केल्याचेही उघड झाले आहे. दीक्षाची आई दीपाली बैसाणे यांच्या तक्रारीनंतर दीक्षाचे वडील भावराव आगळे यांच्यासह तिचे काका दगा व शाहना, काकू इंदूबाई व रेखा, देवीदास आगळे तसेच सचिन सोनवणे यांना रविवारी अटक केली.
दीपाली या पतीपासून वेगळ््या राहतात. त्यांची मुले शुभम व दीक्षा या वडिलांबरोबर राहतात. दगा व सचिन सोनवणे हे तिच्याकडे वाईट नजरेने पाहायचे. पाठलाग करून त्रास द्यायचे. दोन महिन्यांपासून हे सुरू होते. दीक्षाने घरी सांगितल्यावर उलट त्यांनी मानसिक त्रास दिला़ त्या ताणातून तिने आत्महत्या केली़ (प्रतिनिधी)

Web Title: Girl committed suicide due to molestation by Kaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.