बस-कंटेनरच्या अपघातात मुलगी ठार
By admin | Published: May 20, 2016 09:35 AM2016-05-20T09:35:29+5:302016-05-20T09:35:44+5:30
मिनी बसला कंटेनरने शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर येथील श्रीगोंदा तालुक्यात घडली
Next
>ऑनलाइ लोकमत
श्रीगोंदा (अहमदनगर), दि. २० - मिनी बसला कंटेनरने शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर येथील श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. या घटनेत ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. बस चालक चहा पिण्यासाठी साईकृपा डेअरीसमोरील हाॅटेलमध्ये गेला आणि कंटेनरने बसला पाठी मागून जोरदार धडक दिली .
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील साईकृपा डेअरीसमोर उभ्या असलेल्या मिनी बसला कंटेनरने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात श्रुती दत्तात्रय सुदनवार (रा. जीवशी बुद्रूक ता भोकरदन जि नांदेड ( वय 17) ही शाळकरी मुलगी जागीच ठार झाली तर आठ जखमी झाले आहेत.
एम. एच. 29 एम 8378 या बसने भोकरदन येथील भाविक तुळजापूर पंढरपूर मोरगाव जेजुरी करून शिर्डीला दर्शनासाठी चालले होते. मात्र त्याच वेळेस त्यांच्या बसला धडक बसून अपघात झाला व एकाचा मृत्यू आणि ८ जण जखमी झाले. धनश्री मनोज कन्नमवार, पुजा नितीन कन्नमवार, शोभा विजय खेळीवाड, प्रतिभा दत्तात्रय सुदनवार, दिव्या संजय एकुलवार, आकांक्षा विजय खोमवाड, साई संजय एकुलवार, विजय सत्यनारायण खोमवाड अशी जखमींची नावे आहेत.