बेलापूरमध्ये तरुणीला १५ दिवस डांबले
By admin | Published: July 11, 2015 02:32 AM2015-07-11T02:32:55+5:302015-07-11T02:32:55+5:30
तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत १५ दिवस डांबून ठेवणाऱ्या आरोपीला धारावी पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान या आरोपीने काही दिवसांपूर्वी साथीदारांच्या
मुंबई : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत १५ दिवस डांबून ठेवणाऱ्या आरोपीला धारावी पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान या आरोपीने काही दिवसांपूर्वी साथीदारांच्या मदतीने एका इसमाचे ३०० गॅ्रम सोने लुटल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्यांत या आरोपीसह त्याच्या इतर तीन साथीदारांनादेखील अटक केली आहे.
सुशील नगेरी (२८) असे या आरोपीचे नाव असून, तो धारावीतील मुकुंद नगर परिसरात राहत होता. रेल्वेमध्ये फिटर या पदावर कार्यरत असलेल्या सुशीलला ऐशआरामात राहण्याची सवय होती. वर्षभरापूर्वी त्याच्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. त्यात १५ दिवसांपूर्वी या आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत घरातून पळवून नेले. त्यानंतर
या मुलीला त्याने बेलापूरमधील
एका घरामध्ये डांबून ठेवत अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिच्याकडील ३ तोळे वजनाचे
दागिनेदेखील या आरोपीने हिसकावून घेतले.
आपली फसवणूक झाल्याचे या तरुणीला समजताच तिने आईशी संपर्क साधत माहिती दिली. त्यानुसार तिच्या आईने धारावी पोलिसांना घटना सांगितल्यानंतर पोलिसांनी बेलापूर येथे जाऊन या तरुणीची सुटका करत या आरोपीला बेड्या ठोकल्या. याच आरोपीने काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याला जिवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडील ३०० ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे चोरली होती. या प्रकरणी पोलिसांनी नितेश आसोदेस, नित्यानंद विनी आणि विश्वनाथन देवेंद्र यांना अटक केली होती. (प्रतिनिधी)