मुलींनी मारली बाजी; ८७.५६ टक्के निकाल

By admin | Published: May 26, 2015 01:23 AM2015-05-26T01:23:46+5:302015-05-26T01:23:46+5:30

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यंदा बारावीचा निकाल ८२ टक्के लागला आहे.

Girls beat up; 87.56 percent result | मुलींनी मारली बाजी; ८७.५६ टक्के निकाल

मुलींनी मारली बाजी; ८७.५६ टक्के निकाल

Next

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यंदा बारावीचा निकाल ८२ टक्के लागला आहे. निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ८७़५६ टक्के तर मुलांचा निकाल ७७़७७ टक्के लागला आहे. त्यात शिरूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील चिन्मय कुमार साहू याने ९५़४० टक्के गुण मिळवून अपंग विद्यार्थ्यांमध्ये देशात दहावा क्रमांक पटकावला आहे.
सीबीएसई बोर्डातर्फे २ मार्च ते २० एप्रिल या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. देशातील तब्बल १० लाख ४० हजार ३६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मागील वर्षी बारावीचा निकाल ८२़७० टक्के लागला होता.
सदर्न कमांडमधील आर्मी पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला असून, शाळेतील २७३ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. या शाळेतून कॉमर्स शाखेतून परीक्षा दिलेल्या धु्रुव राव याने ९४़५ टक्के, विज्ञान शाखेतून परीक्षा दिलेल्या तनया गुप्ता आणि तवनील दुग्गल यांनी ९६़२ टक्के गुण मिळविले आहेत. तर नांकी राणा या विद्यार्थ्याने ९७़२ टक्के गुण मिळवले आहेत.
औंध येथील डीएव्ही पब्लिक स्कूलचा निकाल १00 टक्के लागला असून, शाळेतील १८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. संकल्प गौर याने ९७.६ टक्के गुण मिळविले असून, गौर हा जीईई मेन्स परीक्षेत राज्यात पहिला आला आहे. तर अभिनया नागप्पम हिने कॉमर्स शाखेतून ९४.६ टक्के गुण मिळविले आहेत.
खडकी येथील आर्मी पब्लिक स्कूलचा निकाल १00 टक्के लागला असून, शाळेतील १७२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यात ४३ विद्यार्थ्यांना ९0 टक्के गुण मिळाले असून विशाखा घाडगे हिने ९५.८ टक्के गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर सना खान हिने वाणिज्य शाखेत ९४.२ टक्के गुण मिळविले आहेत.
सीटी इंटरनॅशनल स्कूलचा निकालही चांगला लागला असून ध्रुव सहा आणि कृतिका कुलकोड यांनी ९६.८ टक्के गुण मिळविले आहे.शुभांशु कतीयारने गणित विषयात १00 पैकी १00 गुण मिळविले आहेत.शाळेतील ५0 हून अधिक विद्यार्थ्यांनी ९0 टक्के गुण मिळविले आहेत. वाकड येथील बिशप स्कूलचा निकाल १00 टक्के लागला असून, ३८ विद्यार्थ्यांमधून अभिषेक कुमार याने ९७.८ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक पटकावला आहे. लोहगाव येथील केंद्रीय विद्यालयातील ८३ विद्यार्थ्यांपैकी ८0 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर देहू रोड येथील केंद्रीय विद्यालयातील ९६ विद्यार्थ्यांपैकी ८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Girls beat up; 87.56 percent result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.