दहावीच्या निकालातही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल
By admin | Published: June 13, 2017 11:14 AM2017-06-13T11:14:01+5:302017-06-13T15:09:43+5:30
राज्य मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहिर झाला आहे. दहावीचा एकूण निकाल ८८.७४ टक्के लागला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 13 - राज्य मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहिर झाला आहे. दहावीचा एकूण निकाल ८८.७४ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलांचे पास होण्याचे प्रमाण ८६.५१ टक्के असून मुलींची टक्केवारी ९१.४६ आहे. राज्य शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली. राज्याच्या निकालाची टक्केवारी घटल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. नापास झालेल्या विद्यार्थींची फेरपरीक्षा 18 जुलैला घेण्यात येणार आहे.
१७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यामधील 1 लाख 8 हजार 915 विद्यार्थी एटीकेटीमध्ये पास झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. कोकण मध्ये ९६.१८ टक्के विद्यार्था पास झाले आहेत. 90 टेक्क्यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थांची संख्या 48 हजार 470 आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना कलचाचणीचा अहवाल व मूळ गुणपत्रिका २४ जून रोजी शाळेत मिळणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने जाहिर केले.
राज्य मंडळाने एकूण ५६ विषयांची परीक्षा घेतली होती. त्यापैकी १० विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
राज्यातील २१ हजार ६८४ शाळांमधून १६ लाख ५० हजार ४९९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.
- पिंपरी चिंचवडमध्ये दहावीचा निकाल ९३.३७
पिंपरी चिंचवडचा दहावीचा निकाल ९३.३७ टक्के इतका आहे. बारावीनंतर दहावीच्या परिक्षेतही मुलींचा टक्का अधिक आहे.
पिंपरी चिंचवडमधील १७४ शाळांमधुन १८ हजार ७३ विद्यार्थी परिक्षेला बसले होते.त्यापैकी १६ हजार ८५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये ९४.७२ टक्के मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आहे. तर मुलांची टक्केवारी ९२.२२ इतकी आहे.
शहराच्या विविध भागातील खासगी संस्था तसंच महापालिकेच्या शाळांमधून ९७९४ मुले आणि ८ हजार २६२ मुलींनी दहावीची परीक्षा दिली. एकुण १८ हजार ५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून ९ हजार ३२ विद्यार्थी आणि ७८२६ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत
निकालाची विभागनिहाय आकडेवारी
विभाग टक्के
पुणे ९१.९५
नागपूर ८३.६७
औरंगाबाद ८८.१५
मुंबई ९०.०९
कोल्हापूर ९३.५९
अमरावती ८४.३५
नाशिक ८७.७६
लातूर ८५.२२
कोकण ९६.१८
एकूण। ८८.७४
येथे पहा निकाल..