कोल्हापूर विभागात मुलीच भारी
By admin | Published: June 6, 2016 03:49 PM2016-06-06T15:49:28+5:302016-06-06T15:49:28+5:30
बारावीनंतर आता दहावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागात 94.84 टक्यांसह कोल्हापूर जिल्ह्याने अव्वल ठरत सोमवारी बाजी मारली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 6 - बारावीनंतर आता दहावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागात 94.84 टक्यांसह कोल्हापूर जिल्ह्याने अव्वल ठरत सोमवारी बाजी मारली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कोल्हापूर विभागाचा दहावीचा एकत्रित निकाल 93.89 टक्के लागला.त्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत 1.23 टक्क्यांनी घट झाली असली तरी, राज्यात या विभागाने सलग चौथ्या वर्षी आपला द्वितीय क्रमांक कायम राखला आहे.
कोल्हापूर विभागात यंदाही मुलांच्या तुलनेत मुली भारी ठरल्या असून त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 2.41 टक्यांनी अधिक आहे.
यंदा राज्याचा निकाल ८९.५६ टक्के लागला आहे.