आश्रमशाळेत विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Published: February 25, 2017 04:39 AM2017-02-25T04:39:35+5:302017-02-25T04:39:35+5:30

अंघोळीला गरम पाणी न मिळाल्याच्या कारणावरुन पाडेगाव (ता. खंडाळा) आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली

The girl's suicide in the ashram school | आश्रमशाळेत विद्यार्थिनीची आत्महत्या

आश्रमशाळेत विद्यार्थिनीची आत्महत्या

Next

लोणंद (जि.सातारा) : अंघोळीला गरम पाणी न मिळाल्याच्या कारणावरुन पाडेगाव (ता. खंडाळा) आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्षता लक्ष्मण पढेर (वय १६, रा. पर्वती, जनता वसाहत, पुणे, सध्या रा. आश्रमशाळा, पाडेगाव) असे तिचे नाव आहे.
पाडेगाव येथे मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था संचलित समता आश्रमशाळेत अक्षता शिकत होती. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास ती अंघोळीसाठी खाली गेली. तिला लवकर गरम पाणी पाहिजे होते परंतु रांगेतील मुलींनी तिला नंबर दिला नाही. याचा राग आल्याने ती रडत खोलीत गेली आणि आतून कडी लावून घेतली. बराच वेळ तिने दार न उघडल्याने मुलींनी शिक्षकांना बोलावले. शिक्षकांनी दरवाजा मोडून खोलीत प्रवेश केला असता खिडकीच्या अँगलला ओढणीच्या साह्याने तिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तिची जवळची मैत्रीण पूनम कांबळे या दोघी भोर तालुक्यातील पांगारी येथील शाळेत २०१३ मध्ये एकत्र शिक्षण घेत होत्या. पूनम हिनेही पुण्यात आत्महत्या केली होती. (वार्ताहर)

Web Title: The girl's suicide in the ashram school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.