दुष्काळग्रस्तांना ४ हजार कोटी द्या

By admin | Published: November 18, 2015 02:40 AM2015-11-18T02:40:37+5:302015-11-18T02:40:37+5:30

राज्यांतील १५,७४७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या गावांसाठी राज्य शासनाने ४००२.८२ कोटी रुपयांची तातडीची मदत केंद्र सरकारकडे मागितली आहे, अशी माहिती

Give 4 thousand crores to drought victims | दुष्काळग्रस्तांना ४ हजार कोटी द्या

दुष्काळग्रस्तांना ४ हजार कोटी द्या

Next

मुंबई : राज्यांतील १५,७४७ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या गावांसाठी राज्य शासनाने ४००२.८२ कोटी रुपयांची तातडीची मदत केंद्र सरकारकडे मागितली आहे, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावर्षी पावसाळ््यात जून वगळता सर्व महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. १ जून ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत सरासरीच्या ५९.४० टक्केच पाऊस पडला. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या २५ ते ५० टक्के व १६ जिल्ह्यांमध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस पडला आहे.
औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे, अमरावती या विभागांमधील धरणांमध्ये आॅक्टोबर, २०१४ मध्ये ७४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मात्र, यावर्षी आॅक्टोबरअखेर ५३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आॅक्टोबरमध्ये राज्यात ६३ टँकरव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र, यावर्षी आॅक्टोबरमध्ये ६५३ टँकर व्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे की, जो मागील वर्षाच्या १० पटींपेक्षा जास्त असल्याचे खडसे यांनी सांगितले. राज्यात आॅक्टोबर अखेर रब्बी पिकांची फक्त ४३ टक्के पेरणी झालेली आहे. या टंचाईग्रस्त गावांमधील ५३.११ लक्ष हेक्टर क्षेत्र प्रभावित झालेले आहे. या बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३५७८.४३ कोटी रुपये मदतीची आवश्यकता आहे, असेही खडसे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Give 4 thousand crores to drought victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.