‘कामगारांना पेन्शनसोबत मूलभूत सुविधा देणार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 05:06 AM2017-08-14T05:06:20+5:302017-08-14T05:06:22+5:30
अटल पेन्शन योजनेबरोबरच इतर सर्व मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी रविवारी येथे केले.
शिर्डी : महाराष्ट्राबरोबरच देशातील सर्व स्तरातील कामगारांना वाढीव पेन्शनबरोबरच, सर्वांसाठी घरे, आरोग्यदायी विविध सुविधा, जीवन सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजनेबरोबरच इतर सर्व मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी रविवारी येथे केले.
महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाचे उद्घाटन बंडारु दत्तात्रेय यांच्या हस्ते झाले. बंडारू म्हणाले की, मी तुमच्यासारखाच एक कामगार आहे. त्यामुळे मला तुमच्या सर्व प्रश्नांची जाणीव आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस सुभाष कुलकर्णी यांनी केले. सर्व कामगारांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून आपण दिशादर्शक काम उभे करु, असे बंडारु दत्तात्रेय यांनी सांगितले.