अबू सालेमला जन्मठेप द्या, सीबीआयची मागणी

By Admin | Published: July 4, 2017 03:58 PM2017-07-04T15:58:27+5:302017-07-04T16:16:13+5:30

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सीबीआयने न्यायालयात केली आहे

Give birth to Abu Salem, give birth to CBI | अबू सालेमला जन्मठेप द्या, सीबीआयची मागणी

अबू सालेमला जन्मठेप द्या, सीबीआयची मागणी

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सीबीआयने न्यायालयात केली आहे. सालेमनं केलेलं कृत्य हे फाशीच्या शिक्षेच्या योग्यतेचं आहे, मात्र प्रत्यार्पण कायद्यानुसार फाशी देऊ शकत नाही असं सांगत सीबीआयने जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली. विशेष टाडा न्यायालयात आरोपींना काय शिक्षा द्यायची, यावरून युक्तिवाद सुरू आहे. सीबीआयने ताहीर मर्चंट आणि करीमुल्ला खानला फाशीचीच शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी विशेष टाडा न्यायालयाला केली आहे. पोर्तुगालमधून भारतात प्रत्यार्पण करून आणलेला अबू सालेमही फाशीच्या शिक्षेस पात्र आहे, मात्र त्यात कायदेशीर अडचणी आहेत, असे सीबीआयने विशेष न्यायालयाला याआधीही सांगितले होते. 

 
मुस्तफा डोसाचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी सीबीआयने दोषींना कोणती शिक्षा ठोठवायची, यासाठी विशेष न्यायालयात युक्तिवाद करण्यास सुरुवात केली. सीबीआयचे वकील दीपक साळवी यांनी मुस्तफा डोसा व फिरोज खान यांच्याप्रमाणे करीमुल्ला खान व ताहीर मर्चंट यांच्यासाठीही फाशीच्या शिक्षेची मागणी विशेष न्यायालयाकडे केली होती.
 
करीमुल्ला दाऊद इब्राहिम व टायगर मेननच्या सतत संपर्कात होता; तर ताहीर मर्चंटनेही या बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावली, असे सीबीआयने न्यायालयाला सांगितले होते. तसेच अबू सालेमही फाशीच्या शिक्षेस पात्र आहे, मात्र कायदेशीर अडचणींमुळे त्याच्यासाठी या शिक्षेची मागणी केली जाऊ शकत नाही, असे साळवी यांनी न्यायालयाला सांगितले होते.
 
सालेमसह मुस्तफा डोसा, फिरोज अब्दुल रशिद खान, करीमुल्ला खान उर्फ हुसेन हबीब शेख, ताहीर मर्चंट उर्फ ताहीर टकल्या यांना न्यायालयाने टाडा कायदा आणि भारतीय दंडविधानाच्या कलम १२० (ब)नुसार बॉम्बस्फोटाचा कट रचणे, तो कट अंमलात आणून शेकडो निष्पापांची हत्या करणे व हत्येचा कट रचल्याच्या मुख्य आरोपांमध्ये दोषी ठरवले आहे व रियाझ सिद्दिकीला केवळ टाडा कायद्याअंतर्गत दोषी ठरवले आहे.
 
आरोपी मुस्तफा डोसाचा मृत्यू
1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवलेल्या मुस्तफा डोसा याचा 28 जून रोजी जे.जे. रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याला उच्च रक्तदाब व मधुमेहाचा होता.
 
विशेष टाडा न्यायालयाने १६ जून रोजी त्याला १९९३ साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवले होते. न्यायालयाने दोषी ठरवल्याबद्दल डोसाला धक्का बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसत होता. या निर्णयानंतर त्याची तब्येत खालावत गेली. त्यामुळे न्यायालयाने त्याला रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. मात्र डोसाने स्पष्ट नकार दिला. ‘मरायचंच आहे तर रुग्णालयात दाखल का होऊ?’ असे त्याने न्यायालयाला सांगितले होते.
 
डोसाची तब्येत बिघडल्याने मंगळवारी मध्यरात्री १च्या सुमारास त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तीन तासांच्या उपचारानंतर त्याला आर्थर रोड कारागृहात पाठवले. पण काही काळाने त्याला ताप आला व छातीतही दुखू लागले. सकाळी पुन्हा त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल केले. या वेळी उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुपारी २.३०च्या सुमारास डोसाचा मृत्यू झाला, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली होती.
 
१९९३ बॉम्बस्फोटांतील डोसाची भूमिका-
मुंबईमध्ये १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत २५७ जणांचा मृत्यू झाला तर ७००हून अधिक लोक गंभीररीत्या जखमी झाले. सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता याने १९९५ साली दिलेल्या जबाबावरून मुस्तफा डोसाला या स्फोटाचा आरोपी करण्यात आले.
 
त्याला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २० मार्च २००३ रोजी अटक करण्यात आली. मात्र डोसाने आपण निर्दोष असून ते सिद्ध करण्यासाठी स्वत:हून पोलिसांना शरण आल्याचा दावा न्यायालयापुढे केला होता.
 

Web Title: Give birth to Abu Salem, give birth to CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.