कोकणातील बागायतदार, मच्छीमारांना कर्जमाफी द्या

By admin | Published: July 2, 2017 03:50 AM2017-07-02T03:50:40+5:302017-07-02T03:50:40+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसची संघर्ष यात्रा व शेतकऱ्यांनी संपाच्या माध्यमातून राज्यभर केलेल्या उठावापुढे राज्य सरकारला झुकावे लागले. आता

Give loan apology to fishermen in Konkan, fishermen | कोकणातील बागायतदार, मच्छीमारांना कर्जमाफी द्या

कोकणातील बागायतदार, मच्छीमारांना कर्जमाफी द्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसची संघर्ष यात्रा व शेतकऱ्यांनी संपाच्या माध्यमातून राज्यभर केलेल्या उठावापुढे राज्य सरकारला झुकावे लागले. आता कोकणातील कमी कर्ज घेणारे शेतकरी, फळ बागायतदार, मच्छीमारांनाही कर्जमाफी मिळाली पाहिजे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पावसाळी अधिवेशनात आवाज उठवेल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जमाफी व निलंबनाच्या प्रश्नावरून संघर्ष यात्रेद्वारे राज्यात जागृती केली. यंदाच्या कर्जमाफी निर्णयात अनेक त्रुटी आहेत. नोटबंदीनंतर भाजपा सरकारने राज्यातील जिल्हा बँकांमधील कोट्यवधी रुपयांच्या नोटा भरून घेण्यास नकार देऊन जिल्हा बँकांची कोंडी केली. मात्र भाजपाच्या ताब्यात असलेल्या अर्बन बँकांना अभय दिले.
बँकांमध्ये ८ महिने पडून असलेल्या पैशांवर व्याज मिळावे, असे प्रयत्न आता सुरू आहेत. व्याज दिले नाही तर त्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात न्याय मागितला जाईल, असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, सत्तेला भाजपा व सेना हे पक्ष गोचिडाप्रमाणे चिकटलेले आहेत. कागदावरील शाई उडून सेना नेत्यांच्या खिशातील राजीनाम्याचे कागद आता कोरे झाले असतील.
त्यामुळे मध्यावधीची शक्यता नाही. राजापूरमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला पक्षाचा विरोध आहे. कोकणात रासायनिक कारखाने नकोत.

 म्हणून आमदारांचे निलंबन

कर्जमाफीचा शेतकऱ्यांना नव्हे बँकांना फायदा होतो, असे सांगत कर्जमाफी नाकारणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार अडचणीत येऊ नये, म्हणून राष्ट्रवादीच्या १९ आमदारांना निलंबित केले.

Web Title: Give loan apology to fishermen in Konkan, fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.