कांद्याला १५ रुपये हमीभाव द्या

By admin | Published: May 20, 2016 02:01 AM2016-05-20T02:01:00+5:302016-05-20T02:01:00+5:30

‘कांद्याला किमान १५ रुपये किलो हमीभाव द्या, अन् मग काय रामराज्य करायचं ते करा,’ असा राज्य व केंद्र सरकारला टोला मारून ‘शेतकऱ्यांचे प्रश्न भिजत राहिले;

Give onion price of 15 rupees | कांद्याला १५ रुपये हमीभाव द्या

कांद्याला १५ रुपये हमीभाव द्या

Next


चाकण : ‘कांद्याला किमान १५ रुपये किलो हमीभाव द्या, अन् मग काय रामराज्य करायचं ते करा,’ असा राज्य व केंद्र सरकारला टोला मारून ‘शेतकऱ्यांचे प्रश्न भिजत राहिले; तर खासदारकी काय चाटायची काय?’ असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे केला.
कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी चाकण येथे गुरुवार (दि. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्गावर आंबेठाण चौकात रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांनी संतप्त होऊन कांदा महामार्गावर ओतून दिला.
या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. खा. शेट्टी म्हणाले, की १९८० च्या दशकात शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली व शेतकऱ्यांचे संघटन करून कांद्यासाठी आंदोलन केले. ३५ वर्षांनंतरही शेतमालाच्या भावासाठी शेतकऱ्यांना वारंवार रस्त्यावर उतरावे लागत आहे. शेतमालाचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश केल्याने जीवनावश्यक वस्तू १९५५ च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार सरकारला प्राप्त झाला. त्यामुळे कांद्याचे भाव वाढले की सरकार हस्तक्षेप करते. पाकिस्तानहून ४० रुपये किलोने कांदा आयात करून शासन येथील शेतकऱ्यांना मातीत घालते, म्हणजे शेतकरी हा पाकिस्तानपेक्षा मोठा शत्रू आहे काय?
उद्योजकांनी सव्वा लाख कोटींचे कर्ज थकविले म्हणून बँकिंग व्यवसाय अडचणीत आला आहे. उद्योजकांना वसुलीचा तगादा लावू नये म्हणून बँकांना २५ हजार कोटी दिले जातात. दुसरीकडे शेतकऱ्याने कर्ज थकविले तर नोटीस फलकावर नाव लावता, त्यांच्या जमिनी लिलाव करून विकता, याचा निषेध केला पाहिजे.
कांदा खाल्ला नाही म्हणून कुणी तडफडून मेला नाही, पण कांद्याला २/४ रुपये भाव मिळाला म्हणून कर्ज फेडता आले नाही, म्हणून शेतकरी गळफास घेतात, याची सरकारला लाज वाटली पाहिजे, अशी घणाघाती टीकाही शेट्टी यांनी केली. (वार्ताहर)
कांदा उत्पादनाचा खर्च किलोमागे १३ रुपये येत असून, सरकार कांद्याला तीन ते सहा रुपये भाव देत असेल, तर शेतकऱ्याने कर्ज कसे फेडायचे? उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची ग्वाही सरकारने दिली होती, म्हणून कांद्याला किमान १५ रुपये हमीभाव मिळाावा. याशिवाय प्रत्येक बाजार समितीमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करावे,
- खा. राजू शेट्टी, नेते स्वाभीमानी शेतकरी संघटना ळ

Web Title: Give onion price of 15 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.