‘वंचित’ मविआत सामील न झाल्यास आपला उमेदवार द्या; पदाधिकाऱ्यांचे उद्धव ठाकरेंना साकडे

By आशीष गावंडे | Published: August 22, 2023 08:54 PM2023-08-22T20:54:39+5:302023-08-22T21:00:57+5:30

आगामी वर्षात हाेऊ घातलेल्या लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत रणनिती आखली जात आहे.

Give our candidate if not included in the ' Vanchit Bahujan Aghadi in MVA; Uddhav Thackeray of office bearers | ‘वंचित’ मविआत सामील न झाल्यास आपला उमेदवार द्या; पदाधिकाऱ्यांचे उद्धव ठाकरेंना साकडे

‘वंचित’ मविआत सामील न झाल्यास आपला उमेदवार द्या; पदाधिकाऱ्यांचे उद्धव ठाकरेंना साकडे

googlenewsNext

अकोला: आगामी लाेकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतवंचित बहुजन आघाडी ऐनवेळेवर सामील न झाल्यास अकाेला लाेकसभा मतदार संघातून शिवसेनेचा उमेदवार द्यावा,असे साकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख,जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर यांसह पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना घातले.

आगामी वर्षात हाेऊ घातलेल्या लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत रणनिती आखली जात आहे. शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर खचून न जाता ठाकरे पक्ष संघटनेसाठी जाेमाने कामाला लागल्याचे दिसत आहे.  लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माताेश्रीवर मंगळवारी सायंकाळी अकाेला लाेकसभा मतदार संघाच्या बैठकीचे आयाेजन केले हाेते. काॅंग्रेस,राष्ट्रवादी काॅंग्रेसला साेबत घेऊनच आगामी लाेकसभा व विधानसभेची निवडणूक लढल्या जाइल,असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत सामील करुन घेण्यास सेनेची काेणतीही अडचण नसल्याच्या मुद्यावरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. परंतु लाेकसभा निवडणुकीचा कालावधी पाहता पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार असल्यामुळे ऐनवेळेवर आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचा पर्याय नाकारल्यास अकाेला लाेकसभा मतदार संघाच्या जागेवर सेनेचा उमेदवार द्यावा,अशी गळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घातली आहे. या बैठकीला सेना नेते सुभाष देसाइ, खा.अरविंत सावंत, खा.विनायक राऊत, संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर, जिल्हाप्रमुख तथा आ.नितीन देशमुख,जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर, माजी आ.दाळू गुरुजी यांसह उपजिल्हाप्रमुख, शहर प्रमुख राजेश मिश्रा, राहुल कराळे उपस्थित हाेते.
 

...तर जिल्ह्यात हाेणार तिहेरी लढत
लाेकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला साेबत घेण्याची भूमिका पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी काॅंग्रेस व राष्ट्रवादीच्या भूमिकेवरही मते व्यक्त केली. वेळप्रसंगी काॅंग्रेस व राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढण्यास सज्ज असेल,असा विश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. तसे झाल्यास जिल्ह्यात तिहेरी लढत पहावयास मिळेल. 

‘त्या’ गटाची काळजी करु नका!
शिवसेनेची दाेन शकले निर्माण झाली असली तरी राज्यातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे तुम्ही पक्ष बांधणीसाठी कामाला लागा, सर्वसामान्यांच्या अडचणी साेडवा. ज्यांनी पक्ष फाेडला त्यांची निवडणुकीत अजिबात काळजी करु नका. असा सल्ला शिंदे गटाचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती आहे.

Web Title: Give our candidate if not included in the ' Vanchit Bahujan Aghadi in MVA; Uddhav Thackeray of office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.