तळीरामांना द्या चालक आणि टॅक्सी सेवा

By admin | Published: December 30, 2016 03:50 AM2016-12-30T03:50:10+5:302016-12-30T03:50:10+5:30

नवीन वर्षाचे स्वागत करताना अनेकांकडून तळीरामांकडून वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. यात अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे तळीराम चालकांना

Give PALISM driver and taxi service | तळीरामांना द्या चालक आणि टॅक्सी सेवा

तळीरामांना द्या चालक आणि टॅक्सी सेवा

Next

मुंबई : नवीन वर्षाचे स्वागत करताना अनेकांकडून तळीरामांकडून वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. यात अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे तळीराम चालकांना रोखण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. तळीराम चालकांकडून अपघात होऊ नये यासाठी बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटना एक पत्रच देण्यात आले आहे. यात तळीराम चालकांचे वाहन असल्यास त्यांना चालक द्या आणि वाहन नसल्यास टॅक्सी सेवा देण्यात यावी, अशी सूचना केली आहे.
दारू पिऊन वाहन चालवणे हा गुन्हा असून प्रमाणापेक्षा जास्त दारू पिऊन वाहन चालवल्यास मोठा दंड व शिक्षेचीही तरतूद आहे. तळीराम चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत २0१५मध्ये १७ हजार ८४९ केसेस दाखल झाल्या होत्या आणि १ हजार ८२६ चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले. २0१६मधील जानेवारी ते जूनपर्यंत १२ हजार ४६६ केसेसची नोंद करतानाच २ हजार ६४२ चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ३१ डिसेंबरच्या दिवशी मुंबई वाहतूक पोलिसांकडून तळीराम चालकांविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मोहीमच हाती घेतली जाते. यंदाही जवळपास २00 ठिकाणी नाकाबंदी केली जाणार असल्याची माहिती सह पोलीस आयुक्त (वाहतूक) मिलिंद भारंबे यांनी दिली. कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहर पोलिसांसोबतच वाहतूक पोलीस असतील. त्याचप्रमाणे तळीराम चालकांना जरब बसावी आणि कठोर कारवाई करणे शक्य व्हावे यादृष्टीने मुंबई वाहतूक पोलिसांनी जीपीएस, कॅमेरासारख्या यंत्रणेसह नव्या ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ मशिन घेतल्या आहेत. जवळपास ५0 मशिन पोलिसांकडे असतील.
तळीराम चालकांना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटकडे आपला मोर्चा वळवला आहे. दारू पिऊन एखादा ग्राहक बारबाहेर आल्यास त्याला टॅक्सी सेवा देण्याची सूचनाच बार मालकांना पत्राद्वारे केली आहे. जर ग्राहकाचे वाहन असल्यास त्याला चालक देण्यात यावा, असेही सूचित केले असल्याचे भारंबे यांनी सांगितले. यामुळे अपघात होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल.

Web Title: Give PALISM driver and taxi service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.