सत्तेत 15 टक्के वाटा द्या

By admin | Published: July 27, 2014 02:04 AM2014-07-27T02:04:55+5:302014-07-27T02:04:55+5:30

सत्तेत 15 टक्के वाटा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी शनिवारी येथे केली.

Give power to 15 percent of the power | सत्तेत 15 टक्के वाटा द्या

सत्तेत 15 टक्के वाटा द्या

Next
औरंगाबाद : विधानसभेच्या जागावाटपात महायुतीने आम्हाला 2क् जागा सोडाव्यात. तसेच सत्तेत 15 टक्के वाटा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी शनिवारी येथे केली. सिडकोतील संत तुकाराम नाटय़गृहात आयोजित विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, तर प्रमुख पाहुणो  म्हणून महिला आघाडीच्या 
राष्ट्रीय कार्याध्यक्ष राखी सावंत उपस्थित होत्या. आठवले यांनी राज्यातील आघाडी सरकार खाली खेचण्याचे आवाहन कार्यकत्र्याना केल़े आम्ही महायुतीत गेलो 
म्हणजे हिंदुत्व स्वीकारले, असे नाही. मुळात ‘जय भीम’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या घोषणा परस्परांच्या विरुद्ध नाहीत. त्यामुळे महायुतीसोबतच राहून विकासाचे राजकारण करणार आहोत, असे आठवले म्हणाले.  (प्रतिनिधी)
 
नोटा घ्या; पण मतदान महायुतीलाच करा
कुणी पैसे देत असेल तर ते घ्या; पण आत जाऊन महायुतीलाच मतदान करा, असे आवाहन राखी सावंत यांनी केले. 
 
स्वतंत्र लढण्याची भाषा करू नये
महाराष्ट्रात सेना किंवा भाजपाने स्वतंत्रपणो लढण्याची भाषा करू नये. स्वतंत्रपणो लढल्यास राज्यात सत्ता येणार नाही. लोकसभेच्या राज्यातील 42 जागा निवडून येण्यात महायुतीतील सर्वच पक्षांचा वाटा आहे, असे आठवले म्हणाल़े

 

Web Title: Give power to 15 percent of the power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.