सत्ता द्या, शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प देतो : उद्धव ठाकरे
By admin | Published: October 5, 2014 12:47 AM2014-10-05T00:47:13+5:302014-10-05T01:15:31+5:30
चिखली (बुलडाणा) येथील शिवसेनेच्या प्रचारासभेत उद्धव ठाकरे यांचे आश्वासन.
चिखली (बुलडाणा): शिवसेनेच्या हाती राज्याची सत्ता द्या, रेल्वे अर्थसंकल्पाच्या धर्तीवर शे तीसाठीही स्वतंत्र अर्थसंकल्प देऊ, असे आश्वासन शिवसेनेचे कार्याध्यक्ष पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी चिखली येथे शनिवारी दिले. राज्यातील बहुतांश नागरिकांच्या उदरनिर्वाहाचे साधन हे शेती आहे; मात्र आतापर्यंत शेतकर्यांचे कैवारी म्हणविणार्यांनीच सत्तेत असूनही शेतकर्यांवर आत्महत्येची पाळी आणली असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी स्थानिक जिल्हा सहकारी बँकेनजिकच्या भव्य प्रांगणामध्ये शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार दिवाकर रावते, खासदार तथा जिल्हा संपर्क प्रमुख प्रतापराव जाधव, पक्षाचे उमेदवार डॉ.प्रतापसिंग राजपूत, आमदार विजयराज शिंदे, डॉ.संजय रायमुलकर, वसंतराव भोजने, संतोष घाटोळ आणि हरीभाऊ हुरसाड, तसेच जिल्हा प्रमुखद्वय धिरज लिंगाडे आणि दत्ता पाटील, युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख रोहीत खेडेकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख अर्जुन नेमाडे, शहर प्रमुख निलेश अंजनकर, शिवाजीराव देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सिंधुताई खेडेकर, चंदाताई बढे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबतच भाजपलाही लक्ष्य केले. ह्यमहाराष्ट्र की सत्ता दो, महाराष्ट्र मे अच्छे दिन आयेंगेह्ण अशी घोषणा करणार्यांनी जी सत्ता मिळाली आहे, तिचा वापर आधी शे तकर्यांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी करा, असा टोला मारला. शेतकर्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करताना, ठाकरे म्हणाले, एकमेव शेतकर्यांच्या समस्यांची जाण असलेले स्व. गोपीनाथराव मुंडे भाजपमध्ये एकमेव नेते होते. सत्ता मिळेपर्यंत भाजपला शिवसेनेची गरज होती. आता सत्ता मिळताच अच्छे दिन आले तर शिवसेना नकोसी होतेय. या स्वार्थी लोकांना शिवसैनिक धडा शिकवतीलच, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राच्या पिढय़ा बरबाद केल्याचा आरोपही त्यांनी केला; मात्र त्यांच्या संपूर्ण भाषणाचा रोख केवळ भाजपकडेच असल्याचे दिसून येत होते.इतर पक्षांनी धनशक्ती आणि जातिय समीकरणांचा विचार करुन उमेदवारांची निवड केली; मात्र शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे, की तो सर्वसामान्य कुटुंबातील शिवसैनिकांना आमदार आणि खासदारकीची संधी देतो. विधानसभेवर भगवा फडकाविण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करा असे आवाहन खा. प्रतापराव जाधव यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचलन निलेश अंजनकर यांनी तर आभार अर्जुन नेमाडे यांनी मानले.